शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

साहित्य संमेलन नाशकात कि दिल्लीत; साहित्यविश्वात जोरदार चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 1:00 PM

९४ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ठिकाणाबद्दल उत्सुकता कायम

ठळक मुद्देदिल्लीकरांनी पुन्हा दिली निमंत्रणाची आठवणदिल्लीतील सरहद संस्थेचा आग्रह 

औरंगाबाद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिक येथून आलेले निमंत्रण साहित्य महामंडळाने स्वीकारले असून, केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. असे असताना आता दिल्लीकरांनी पत्र पाठवून त्यांच्या निमंत्रणाची पुन्हा एकदा साहित्य महामंडळाला आठवण करून दिली आहे.

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, इथपासून ते कोठे होणार इथपर्यंत चर्चा येऊन ठेपली आहे. काही महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत तेथील सरहद संस्थेने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना निमंत्रणाचे पत्र पाठविले होते. दिल्ली सोबतच धुळे आणि नाशिक येथूनही निमंत्रणे मिळाली होती. त्यानंतर मागील आठवड्यातच नाशिक येथील आणखी एका संस्थेने साहित्य संमेलनासाठी निमंत्रण पाठविले होते तर धुळे येथील संस्थेने त्यांचा निमंत्रणाचा प्रस्ताव मागे घेतला होता.

सद्य:स्थितीत साहित्य महामंडळाकडे नाशिक येथील दोन संस्थांकडून आलेले निमंत्रण आणि दिल्लीच्या सरहद संस्थेचे निमंत्रण आहे. यामध्ये नाशिकचे पारडे जड असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. हीच चर्चा थेट दिल्लीपर्यंत पाेहोचल्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत दिल्लीचा विचारही आवर्जून करावा, अशी आठवण देणारे पत्र सरहद संस्थेने पाठविले आहे. एप्रिलपर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात येणार असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२१ पासून तीन दिवसीय साहित्य संमेलन दिल्ली येथे घेण्याची तयारी सरहद संस्थेकडून दाखविली जात आहे.

बैठक केवळ नावालाच का?नाशिकला संमेलन होणार, असा दिल्लीकरांचा गैरसमज झाला आहे, असे डॉ. दादा गोरे यांनी सांगितले. ३ जानेवारी रोजी बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले आणि ५ रोजी नाशिक येथे काही सदस्य भेट देऊन पाहणी करणार आहेत, असेही ते म्हणाले. मग जर ३ रोजी स्थान निश्चितीबाबत निर्णय होणार असेल तर ५ रोजी सदस्य नाशिकला पाहणीला जातील, हे कसे ठरले? त्यामुळे मग ३ जानेवारीची बैठक केवळ नावालाच असणार आहे का, असा प्रश्नही साहित्य वर्तुळात विचारला जात आहे.

३ जानेवारीला निर्णय घेऊसाहित्य संमेलन कुठे घ्यायचे, याविषयी साहित्य महामंडळाच्या सदस्यांची बैठक दि. ३ जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषद येथे होणार आहे. एकूण १८ सदस्यांपैकी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासह इतर दोन जण प्रकृती अस्वस्थतेमुळे बैठकीला येऊ शकणार नाहीत. त्यामुळे बैठकीला उपस्थित उर्वरित सदस्यांपुढे दिल्ली आणि नाशिक असे दोन्ही प्रस्ताव ठेवले जातील आणि सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबादNashikनाशिकdelhiदिल्ली