शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कोचिंग क्लासेसमधील मुलींची सुरक्षा ‘फास्ट ट्रॅक’वर; दामिनी पथक क्लास संचालकांच्या भेटीला

By राम शिनगारे | Updated: November 19, 2022 12:23 IST

उस्मानपुरा पोलिस करणार सुरक्षेचे ‘ऑडिट’

- राम शिनगारेऔरंगाबाद : शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुली-मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्षाचालकाने मुलीची छेड काढल्यानंतर पोलिस आयुक्तांनी दामिनी पथकाला प्रत्येक क्लासेसच्या संचालकांची भेट घेत तेथे शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत, तर उस्मानुपरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील क्लासेसची शिक्षण विभागाच्या नियमानुसार सुरक्षेसाठी तपासणी केली जाणार असल्याची माहिती उस्मानुपरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

उस्मानपुरा येथील क्लास संपवून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची चालकाने छेड काढल्यामुळे तिने धावत्या रिक्षातून थेट उडी घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याशिवाय पोलिस आयुक्तांनी दामिनी पथकाला शहरातील क्लासेसची यादी तयार करून संचालकांची भेट घेत मुलींच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दामिनी पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या नेतृत्वात केबीसी, बनसोड, देशपांडे केमेस्ट्री, विद्यालंकार, रिलायबल, सारथी, शिवाना, अनुप्रास या क्लासेसला भेटी देऊन संचालकांसोबत मुलींमध्ये जनजागृती करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्याशिवाय गायकवाड क्लासेसच्या शहरातील चार शाखा, ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र, राजलक्ष्मी लॅडमार्क अभ्यासिकेलाही भेट दिल्याची माहिती सहायक पाेलिस निरीक्षक सुषमा पवार यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये सर्वच क्लासेसला भेटी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिक्षाचालक, मालकांसाठी स्वतंत्र पथकवाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी रिक्षा युनियनची बैठक पोलिस आयुक्तालयात घेतली. या बैठकीत प्रवाशांसोबत गैरवर्तन, महिला प्रवाशांना चांगली वागणूक, मद्यपान करून वाहन चालवू नये, जास्त क्षमतेने प्रवासी वाहतूक करू नये, अस्ताव्यस्त पार्किंग, भरधाव वाहन चालविणे, वाहनात स्पीकर लावणे यासारखी कृत्ये करू नयेत, ड्रेस परिधान करावा, रिक्षाची कागदपत्रे जवळ बाळगत अटींचे उल्लंघन करू नये, अशा सूचना दिल्या. त्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र पथकाची स्थापना केल्याचेही उपायुक्त गिते यांनी सांगितले.

६१२ रिक्षांवर दंडात्मक कारवाईवाहतूक पोलिसांनी पाचही विभागांत नियमांचा भंग करणाऱ्या ६१२ चालकांना ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. त्याशिवाय २८३ कलमानुसार ७ ऑटो चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई निरीक्षक मनोज बहुरे, जनार्दन साळुंके, सपोनि नितीन कामे यांच्या पथकांनी केली.

असे आहे क्लास संचालकांचे म्हणणे...विद्यार्थिनींना विश्वासात घेत पालकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या काही समस्या असतील, तर त्या सोडविल्या जातात. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संवाद साधला जातो.- मृणालिनी गंगाखेडकर, संचालक, जीडी बायलॉजी क्लास

क्लासमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मुलींच्या जनजागृतीसाठी दामिनी पथकाचा कार्यक्रमही नुकताच घेतला. त्याशिवाय मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी क्लासमध्ये महिलांची एक समितीच नेमली आहे. त्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेसह समस्यांची सोडवणूक केली जाते.- यशवंत चव्हाण, संचालक, चव्हाण केमिस्ट्री क्लास

प्रत्येक आठवड्याला पालकांची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत मुलींच्या समस्यांची सोडवणूक केली जाते. क्लासमधील मुलींसाठी ‘स्टुडंट केअर’ विभाग सुरू केला आहे. त्याशिवाय पूर्ण परिसर सीसीटीव्हीने केला असून, क्लास संपल्यानंतर घरी जाण्याच्या सूचना दिल्या जातात. परिसरात थांबू दिले जात नाही.- प्रा. रामदास गायकवाड, संचालक, गायकवाड क्लासेस

महिनाभरातील वादग्रस्त घटना- उस्मानपुऱ्यात एका क्लासमधून नाश्ता करण्यासाठी गेलेल्या मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण केली.- एका मुलाला बहिणीची छेड काढल्याचा बहाणा करून रेल्वे रुळांकडे नेऊन दोन जणांनी लुटले.- क्लासमधून घरी जाणाऱ्या मुलीची रिक्षातच काढली छेड. त्यामुळे मुलीने रिक्षातून उडी घेतली.- एका मुलीची क्लासमधील मुलाने छेड काढल्याचे प्रकरण उस्मानपुरा ठाण्यात पोहोचले.

टॅग्स :Educationशिक्षणCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस