घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी 

By संतोष हिरेमठ | Published: September 5, 2023 08:04 PM2023-09-05T20:04:51+5:302023-09-05T20:05:09+5:30

अंतरवाली सराटीतील लाठीमारात जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Rupali Chakankar's strong displeasure over the unsanitary conditions in Ghati Hospital | घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी 

घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : घाटीत मंगळवारी जागोजागी  अस्वच्छता  पाहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अंतरवाली सराटीतील लाठीमारात जखमी झालेल्या शरद नरवडे या तरुणाची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या अवस्थेसाठी जबाबदार अधिष्ठातांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आयोगाच्यावतीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे केली, असे रुपाली चाकणकर यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

ट्विटरवर देखील व्यक्त केली नाराजी
आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असताना शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथे भेट दिली.अतिशय अस्वच्छ,दुर्गंधी,कचऱ्याचे ढीग, गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या अशी अवस्था शासकीय रुग्णालयाची आहे. जिथे सामान्य नागरीक उपचारासाठी येतात तिथे स्वच्छता ही अतिशय मूलभूत अपेक्षा आहे. तिथेच जर अशी अवस्था असेल तर रुग्णांच्या बाबतीत कशी काळजी घेत असतील हा प्रश्नच आहे.रुग्णालयात स्वच्छता राखण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांचीही आहे. जिथे आपण आपल्या माणसांना उपचारासाठी आणतो तिथेच कचरा करणे,गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे योग्य नाही.रुग्णालयाच्या या अवस्थेसाठी जबाबदार अधिष्ठाता यांचेवर कारवाई व्हावी,अशी मागणी आयोगाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे, अये ट्विट चाकणकर यांनी केले आहे.

Web Title: Rupali Chakankar's strong displeasure over the unsanitary conditions in Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.