शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे? तरुणाने भररस्त्यात स्वतःचीच बाइक पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:31 IST

सिल्लोडमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर पोलीस कारवाई.

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेने एका तरुणाने चक्क आपली मोटारसायकल भररस्त्यात पेटवून दिली. सिल्लोड-कन्नड रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शरद गणपत भोजने (रा. सावखेडा) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शरद याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याची माहिती असून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अफवेचा धसका आणि भररस्त्यात अग्नितांडवमिळालेल्या माहितीनुसार, शरद भोजने हा दारूच्या नशेत असताना त्याने पेट्रोल टंचाईच्या अफवांचा धसका घेतला. "देशावर संकट आहे, पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे?" असे ओरडत त्याने शुक्रवारी सायंकाळी ६:४० च्या सुमारास आपली मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी उभी करून पेटवून दिली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.

पोलिसांची धाव आणि गुन्हा दाखलघटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पाण्याचे टँकर मागवून आग विझवली आणि जळालेली मोटारसायकल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस कर्मचारी विनोद सरोदे यांच्या तक्रारीवरून, सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शरद भोजने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा नशा उतरल्यानंतर "नशेत हा प्रकार केला" असे म्हणत आरोपीने पोलिसांसमोर पश्चात्ताप व्यक्त केला.

"अफवांवर विश्वास ठेवू नका"; पोलीस निरीक्षकांचे आवाहनसोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत अनेक चुकीचे संदेश फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे की, "जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलची टंचाई नाही. सर्व पंपांवर इंधन सुरळीत मिळत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये किंवा अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल."

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Man Burns Bike Over Fuel Shortage Rumors in Sillod

Web Summary : Fueled by rumors and alcohol, a man in Sillod set his motorcycle ablaze, fearing a fuel shortage. Police intervened, filing charges against Sharad Bhojane after the incident caused traffic disruption. Authorities urged citizens to disregard false information.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर