छ. संभाजीनगरमध्ये बिबट्याची अफवा ठरली फोल; सीसीटीव्हीतला 'तो' प्राणी प्रत्यक्षात होती मांजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:25 IST2026-03-20T17:21:17+5:302026-03-20T17:25:01+5:30

छत्रपती संभाजीनगरकरांचा जीव भांड्यात! श्रीनगरमधील 'तो' संशयास्पद प्राणी बिबट्या नाही, अफवेने अख्खा परिसर हादरला

Rumors of a leopard in the Srinagar area of Chhatrapati Sambhajinagar turned out to be false; 'that' animal seen on CCTV was actually a cat! | छ. संभाजीनगरमध्ये बिबट्याची अफवा ठरली फोल; सीसीटीव्हीतला 'तो' प्राणी प्रत्यक्षात होती मांजर!

छ. संभाजीनगरमध्ये बिबट्याची अफवा ठरली फोल; सीसीटीव्हीतला 'तो' प्राणी प्रत्यक्षात होती मांजर!

छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरी–श्रीनगर परिसरात दोन वर्षांनंतर पुन्हा बिबट्या दिसल्याच्या अफवेने बुधवारी सकाळपासूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद प्राणी दिसल्याची चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि दुपारपर्यंत परिसरात खळबळ उडाली.

काही नागरिकांनी मंगळवारी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि गोंगाट ऐकू आल्याचे सांगितले होते, त्यामुळे भीतीचे वातावरण अधिकच वाढले होते. मात्र, वन विभागाने परिस्थिती स्पष्ट करून नागरिकांची समजूत घातल्यानंतर परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली.

घटनेची माहिती मिळताच बुधवारी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि नागरिकांची विचारपूस केल्यानंतर अखेर हा बिबट्या नसून साधी मांजर असल्याचे स्पष्ट झाले.

घाबरू नका; वन विभागाला कळवा..
वन विभागाच्या पथकाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. “संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ वन विभागाला कळवा; परंतु अफवा पसरवू नका,” असे वन परिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी नागरिकांना सांगितले.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में तेंदुए की अफवाह झूठी निकली; सीसीटीवी में बिल्ली निकली!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में सीसीटीवी फुटेज के आधार पर तेंदुए दिखने की अफवाह फैली। वन विभाग ने जांच कर स्पष्ट किया कि वह एक बिल्ली थी। नागरिकों से अफवाहों से बचने और संदिग्ध गतिविधि की सूचना वन विभाग को देने का आग्रह किया गया है।

Web Title : Leopard scare in Chhatrapati Sambhajinagar debunked; CCTV revealed it was a cat!

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar residents feared a leopard sighting based on CCTV footage. Forest officials investigated and clarified that the animal was a domestic cat. Citizens are urged to avoid spreading rumors and report suspicious activity to the forest department.