शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

औरंगाबादेत एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:48 PM

वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला.राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी व अधिकाºयांचा नवीन वेतनवाढीचा करार झाला नाही. आयबीएने २ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला, पण यास विरोध करून युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी दोन दिवस संप पुकारून आपली ताकद दाखवून दिली. मात्र, याचा फटका बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागला. संपाच्या पहिल्या दिवशीच शहरातील ७०० पैकी ६० टक्के एटीएम बंद होते.आज दुसºया दिवशी बहुतांश एटीएममध्ये खडखडाट होता. सिडको, हडको, शहागंज, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, जालना रोड ते बीड बायपासपर्यंत सर्व ठिकाणच्या राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम बंदच होते. फक्त दोन ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम सुरू असल्याचे आढळून आले. सिडकोतील एसबीआयच्या विभागीय कार्यालय व दूध डेअरी चौकातील व शहागंजमधील करन्सीचेस्ट येथील एटीएम मशीन बंद होते. खाजगी बँका, नागरी सहकारी पतसंस्थेचे एटीएम सुरू होते. महिनाअखेरच्या दिवसात राष्ट्रीयीकृत बँक व एटीएम बंद राहिल्याने बँक खातेदारांनी संताप व्यक्त केला.सुरेंद्र अर्दड या ग्राहकाने सांगितले की, मला आईसाठी औषध घ्यावयाचे होते. त्यासाठी आज सिडको एन-५, एन- ६ व एन-३ परिसरातील ६ एटीएममध्ये जाऊन आलो, पण सर्व बंद होते. अखेर डिजिटल मनीचा वापर करून औषध विक्रेत्याचे बिल फेडले. अश्विनी माने या तरुणीने सांगितले की, परभणी येथून वडिलांनी माझ्या बँक खात्यात पैसे जमा केले होते, पण दोन दिवस एटीएम बंद असल्याने मला रक्कम काढता आली नाही.नागरिक म्हणतात...आदित्य जहागीरदार या व्यावसायिकाने सांगितले की, मी समोरच्या पार्टीला धनादेश दिला होता, पण बँक बंद असल्याने तो त्यांना वटविता आला नाही. तर शैलेश सोमाणी यांनी बँक कर्मचाºयांच्या संपावर संताप व्यक्त केला.ग्राहकांच्या जिवावर बँका चालवितात व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ग्राहकांनाच वेठीस धरल्या जाते. बँक युनियनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अशाच प्रतिक्रिया अन्य नागरिकांनीही व्यक्त केल्या.लढून, संघर्ष करून घेऊ वेतनवाढ‘लढून, संघर्ष करून घेऊ वेतनवाढ’,‘२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवणारी आयबीए मुर्दाबाद,’ अशी घोषणा देत बँक कर्मचारी-अधिकाºयांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. मागील दोन दिवसांत सुमारे १६०० कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा, युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने यावेळी केला.यूएफबीयूच्या वतीने गुरुवारी सकाळी सिडकोतील एसबीआय (जुने स्टेट बँक आॅफ हैदराबाद) च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेमधील कर्मचारी एकवटले होते. यावेळी ‘हक्काने घेऊ वेतनवाढ’, ‘यूएफबीयू जिंदाबाद,’ अशा घोषणा देण्यात आल्या.आयबीएने २ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला याचा यावेळी सर्व वक्त्यांनी निषेध व्यक्त केला. यूएफबीयूचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, जन-धन योजना, नोटाबंदी व विविध सरकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाºयांचा मोठा वाटा आहे. मात्र, सरकारला याचा विसर पडला. यावेळी सुनील शिंदे, महेश गोसावी, उत्तम भाकरे, गणेश पैैठणे, हिंदप्रकाश जैस्वाल यांची भाषणे झाली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAurangabadऔरंगाबादbankबँकEmployeeकर्मचारीStrikeसंप