शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

औरंगाबादेत परीक्षेच्या तोंडावर स्कूल बसवर ‘आरटीओ’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:47 PM

वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल बसेस पूर्ववत सुरू करण्याची संधी दिल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देगतवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणार्‍या स्कूल बसला ४ ते ३१ मेदरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्कूल बसची तपासणी करून घेतली; परंतु अनेक स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले.ही बाब आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आली; परंतु याच वेळी कारवाई करण्याऐवजी कागदोपत्री सूचना देण्याची जुजबी प्रक्रिया करण्यात आली.

औरंगाबाद : वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल बसेस पूर्ववत सुरू करण्याची संधी दिल्याची ओरड होत आहे.

गतवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणार्‍या स्कूल बसला ४ ते ३१ मेदरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्कूल बसची तपासणी करून घेतली; परंतु अनेक स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले. ही बाब आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आली; परंतु याच वेळी कारवाई करण्याऐवजी कागदोपत्री सूचना देण्याची जुजबी प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे स्कूल बसचालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरवली. तब्बल सात महिने कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा खास तपासणीपासून दूर राहिलेल्या स्कूल बसचालकांसाठी १७ डिसेंबर रोजी स्कूल बसची तपासणी मोहीम राबविण्यात आली; परंतु त्याकडे स्कूल बसचालकांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालय किमान आतातरी कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु त्यालाही विलंब झाला. कारवाईसाठी थेट नव्या वर्षात फेब्रुवारीचा मुहूर्त सापडला आणि १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित झाले. या स्कूल बसेसचे चार महिन्यांसाठी परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईचा फटका फक्त विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते.

विद्यार्थ्यांची गैरसोय, स्कूल बसची काळजीशालेय विद्यार्थ्यांच्या मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा होतील. यावेळी स्कूल बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेनंतर उन्हाळी सुट्या लागतील. सध्या परवाने निलंबित झालेल्या स्कूल बसमधून शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे; परंतु स्कूल बसचालकांची काळजी घेण्यात आल्याचेच दिसते. या निलंबनाच्या कारवाईदरम्यान स्कूल बसची तपासणी करून त्रुटींची पूर्तता करावी लागणार आहे. ही एकप्रकारे संधीच देण्यात आली आहे.

निलंबन कालावधी कमी चार महिन्यांनंतर म्हणजे उन्हाळी सुट्यांनंतर जूनमध्ये शाळा सुरू होतील. तेव्हा या स्कू ल बस नेहमीप्रमाणे चालविता येतील, अशी खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍यांमध्ये सुरू आहे. त्यासाठी परवाना निलंबिनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला. चार महिन्यांऐवजी पाच ते सहा महिन्यांसाठी परवाने निलंबित झाले असते तर या स्कूल बसचालकांची अडचण झाली असती. याविषयी आरटीओ कार्यालयाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी नियमानुसार ही कारवाई केल्याचे सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीRto officeआरटीओ ऑफीस