शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजूर-पैठण रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: March 14, 2016 00:34 IST

जालना : राजूर ते पैठण रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय राखीव निधीतून ७० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी तीन मार्गांचा अभ्यास केला जात असून,

जालना : राजूर ते पैठण रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय राखीव निधीतून ७० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी तीन मार्गांचा अभ्यास केला जात असून, ज्या मार्गावर सर्वाधिक गावे असतील वा वर्दळ असेल असा मार्ग निश्चित केला जाईल. तसेच जालना शहरताील रस्ते काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच या रस्त्यांचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची रविवारी पत्रकार परिषदेत दिली.दानवे म्हणाले, जालना शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच शहरातील उर्वरित अंतर्गत रस्त्यांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. रखडलेल्या लोअर दूधना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडे २४५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जाईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच नांदूर-मधमेश्वर धरणासाठी ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गतच्या विविध कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात येतील. तसेच मराठवाड्यात जलयुक्तची कामे करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून ३६ पोकलेन मशिन घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध नद्यांचे या कामांसाठी सर्व्हेक्षण सुरु असून अंतिम यादी लवकरच तयार केली जाईल, अशी माहिती दानवे यांनी दिली.अग्रसेन चौक ते बालाजी चौक आणि शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड केबलिंग केली जाणार आहे. यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाल्याचे दानवे म्हणाले. या कामामुळे या परिसरात तारांचे जाळे दूर होणार आहे. रस्ते मोकळे राहणार आहेत. आरएपीडीआरपी योजनेंतर्गत शहरासाठी ३०० ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून पैकी २५० ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. उर्वरित लवकरच बसविण्यात येतील.