औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहाचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:53 IST2018-07-20T15:52:07+5:302018-07-20T15:53:59+5:30
संत तुकाराम नाट्यगृहाच्या पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळ्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. यात कसलीही जीवितहानी झाली नाही.

औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहाचे छत कोसळले
औरंगाबाद : संत तुकाराम नाट्यगृहाच्या पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळ्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. यात कसलीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी संत तुकाराम नाट्यगृहात म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम सुरु होता. सोडतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण नाट्यगृहातून बाहेर पडत असताना अचानक पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग खाली कोसळला. यात दोन महिला बालंबाल बचावल्या.
घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी करून छताच्या तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.