शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तळपिंप्री येथील रोहयो कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

औरंगाबाद :महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईचे आदेश दिले असले तरी संबंधितांनी केराची टोपली दाखविली आहे.

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील तळपिंप्री येथे ग्रुपग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी संबंधितांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.तळपिंप्री येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी दि. २२ एप्रिल २०१२ रोजी अण्णासाहेब भानुदास निकम यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर सीईओंनी गंगापूरचे गटविकास अधिकारी, जि.प. बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना याप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते; चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर सदर कामात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सीईओंनी कडक कारवाई करून मला अहवाल सादर करावा, असा आदेश काढला. असे असले तरी आजपर्यंत या प्रकरणी कुठलीच कारवाई झालेली नाही, असे तक्रारदार अण्णासाहेब निकम यांचे म्हणणे आहे. त्यांनी दि. ३ जुलै २०१४ रोजी पुन्हा सीईओंना पत्र पाठवून आपल्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे कळविले आहे.गंगापूर येथील संबंधित अधिकारी, अभियंता व कर्मचारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून ते सीईओंच्या आदेशालाही मानत नाहीत, असे निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे.