शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:00 IST

घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली.

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याबाबत शुक्रवारीदेखील पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नाहीत. एखाद्या माहीतगाराच्या माहितीवरूनच हा दरोडा पडल्याचा धागा पकडून पोलिसांनी आता तांत्रिक तपासावर अधिक भर दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी मध्यरात्री लड्डा यांच्या घरात सहा शस्त्रधारी दरोडेखोरांनी लूट केली. घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली. विशेष म्हणजे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील वसाहतीत दोन तास ही लुटमार सुरू होती. ७ मे रोजी लड्डा पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी गेल्यानंतर ही घटना घडली.

तांत्रिक तपासावर भरसुरुवातीला एमआयडीसी वाळूजचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्याकडे तपास होता. शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे तपास सोपवला. त्यांना एमआयडीसी वाळूज पोलिस, सायबरची पथके मदतीस दिली. शुक्रवारी नऊपैकी एक पथक दरोड्यानंतर कार जाणाऱ्या मार्गावरील, तर दुसरे परतीच्या मार्गावरील फुटेज तपासत होते. १७० कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपासासाठी ३ पथकांचे सीडीआर, डंप डेटाचे विश्लेषण सुरू होते. उर्वरित दोन पथकांना संशयितांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली. शिवाय, अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या रेकॉर्डवरील टोळ्यांची माहिती घेणे सुरू होते.

वीसपेक्षा अधिकांची चौकशीपोलिसांनी लड्डा यांच्या कंपनीतील वीसपेक्षा जास्त कामगारांची चौकशी केली. संजय झळके यांना दिवसभर प्रश्न विचारण्यात आले. दरोडेखोरांनी लंपास केलेला मोबाइल तांत्रिक तपासात कामगार चौकाच्या आसपास असल्याचे निष्पन्न झाले. दरोडेखोर लुधियाना ढाब्यापर्यंत गेले. तेथून पुढे ते कुठे गेले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. दरोडेखोरांनी घूमजाव केला कुठे, या प्रश्नामुळे शुक्रवारीही बजाजनगर, पाटोदा, वळदगावच्या ८ किलोमीटरमध्येच सीसीटीव्ही फुटेजचा तपास अडकला होता. लड्डा ७ मे रोजी अमेरिकेला गेले. दरोडेखोरांनी सहज कट रचून दरोडा टाकला. त्यांची प्रवेशाची जागादेखील ठरली होती. दरोडेखोरांच्या देहबोलीमुळे माहीतगाराच्या टीपवरूनच हा कट रचला गेल्याच्या धाग्यावर पोलिस तपासाचा भर आहे.

टॅग्स :Robberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी