शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कपडे विक्रेत्याला रामनगरात भरदिवसा लुटले

By admin | Updated: September 21, 2014 00:13 IST

औरंगाबाद : दारोदार फिरून कपडे विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला दोन तरुणांनी मारहाण करीत लुटल्याची घटना काल दुपारी रामनगर परिसरात घडली.

औरंगाबाद : दारोदार फिरून कपडे विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला दोन तरुणांनी मारहाण करीत लुटल्याची घटना काल दुपारी रामनगर परिसरात घडली. लुटमारी करणाऱ्या दोघांपैकी शरद मारुती पवार (२७, रा. रामनगर, मुकुंदवाडी) या एका आरोपीला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जावेद युसूफ रिझवी (२१) हा युवक गल्लोगल्ली फिरून कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करतो. कपडे विक्रीसाठी तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत आलेला होता. काल दुपारी तो रामनगर परिसरात फिरत असताना आरोपी शरद पवार व त्याच्या साथीदाराने जावेदला थांबविले. आम्हाला कपडे दाखव, असे दोन्ही आरोपी म्हणाले. जावेदने त्यांना कपडे दाखविण्यास सुरुवात केली. अचानक आरोपी शरदने जावेदच्या हातातील सर्व कपडे हिसकावून घेतले आणि ‘चल खिशात किती पैसे आहेत दाखव’ असे म्हणत त्याच्या खिशातील दीड हजार रुपयेही हिसकावून घेतले आणि पळ काढला. तेव्हा जावेदने आरडाओरड सुरू केली. हे पाहून आसपासचे नागरिक धावत आले. नागरिकांनी पाठलाग करून दोनपैकी शरद पवार या आरोपीला पकडले. त्याला चोप दिला आणि नंतर मुकुंदवाडी पोलिसांना बोलावून या आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले. आरोपींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.