शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या बाजूची वाहने ठरताहेत वाहनकोंडीला कारणीभूत

By admin | Updated: August 21, 2015 00:43 IST

अंबाजोगाई : अरूंद रस्ते व त्या रस्त्यावर उभी असणारी दुचाकी व चारचाकी वाहने वाहतुकीची मोठी कोंडी करतात. याचा मोठा त्रास विद्यार्थी, बालकांसह

अंबाजोगाई : अरूंद रस्ते व त्या रस्त्यावर उभी असणारी दुचाकी व चारचाकी वाहने वाहतुकीची मोठी कोंडी करतात. याचा मोठा त्रास विद्यार्थी, बालकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. अक्षरश: तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करण्याची वेळ अंबाजोगाईकरांवर येते. घरातून निघाल्यावर परत जाईपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. अंबाजोगाई शहारातील बसस्थानक ते शिवाजी चौक, सावरकरचौक ते सायगाव नाका या मुख्य रस्त्यावर शाळा, कोचिंग क्लासेस, विविध रुग्णालये, संगणक शाळा, व्यापार पेठ, विविध कार्यालये, नागरी बँका व आर्थिक संस्था याच मुख्य रस्त्यावर आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी असते. या परिसरात असणाऱ्या रुग्णालयांसमोर रिक्षा, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास लावलेली असतात. परिणामी रस्त्याने चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना तारेवरची कसरत करत हा रस्ता पार करावा लागतो. या परिसरात मोठमोठी खाजगी रुग्णालये आहेत. मात्र, कोणत्याही रुग्णालयाकडे स्वत:ची पार्किंगची व्यवस्था नाही. रुग्णालयात येणाऱ्या सर्वांचीच वाहने सर्रास रस्त्यावरच लावली जातात. यामुळे वाहतुकीचा प्रश्न या परिसरात दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याने जाणारी वाहने एकाच मार्गाने ये-जा करीत असल्याने व एखादे मोठे वाहन जर या रस्त्यावर आले तर अर्धातास वाहतुक यंत्रणा ठप्प राहते. हे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरूच आहे. नगर परिषद व पोलिस प्रशासनाने या परिसरातील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी टाकलेला आडवा बांबूही काढून टाकण्यात येतो. अशीच अवस्था शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची झाली आहे. यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी चौक, मेडीकल कॉलेज ते भगवानबाबा चौक, तसेच योगेश्वरी मंदिर रस्ता, या सर्वच मुख्य रस्त्यांवर अवैध वाहतूक करणारी वाहने सर्रास उभी असतात. अरूंद रस्ते व उभी असलेली वाहने याचा मोठा फटका शहरवासियांना बसतो. परिणामी लहान-मोठे अपघात सातत्याने घडत असतात. अंबाजोगाई बसस्थाकासमोरही रस्त्यावर दुचाकी गाडया, हातगाडया लावण्यात येत असल्यामुळे परिसरातही वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बसस्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तेथे प्रति वाहन पाच रुपये अशी दरआकारणी होत असल्याने फुकटात वाहने रस्त्यावर लावण्याची सवयच वाहनधारकांना लागल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नगर परिषदेने करावी अशी मागणी राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केली. (वार्ताहर)