शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते आराखडा; मतभेदांना तोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:51 IST

भूमिगत गटार योजनेचे काम ३0 टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्ते विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. यात २0११ साली बनविण्यात आलेला आराखड्याचेच नवीन दरानुसार सादरीकरण करताना वस्तीच नसलेल्या भागातील रस्त्यांवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील मतभेद उघड झाले.

ठळक मुद्देगदारोळ : अनेक रस्त्यांना नावेच नसल्याने बोंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूमिगत गटार योजनेचे काम ३0 टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्ते विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. यात २0११ साली बनविण्यात आलेला आराखड्याचेच नवीन दरानुसार सादरीकरण करताना वस्तीच नसलेल्या भागातील रस्त्यांवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील मतभेद उघड झाले.न.प.च्या सभेनंतर नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक नेहालभैय्या, अनिता सूर्यतळ, गणेश बांगर, नाना नायक, माबूद बागवान, आरीफ लाला, अशोक नाईक, राम कदम, जावेद राज, उमेश गुट्टे, राजेश गोटे आदींची यावेळी उपस्थिती होती. हिंगोली शहरात अनेक नव्या वस्त्या अस्तित्वात येत आहेत. अशा वस्त्यांना जोडणारे मोठे रस्ते होणे स्वागतार्हच बाब आहे. काही वस्त्या पूर्ण तर काही अर्धवट वसल्या आहेत. अशा वस्त्यांचे १२, १५ व १८ मीटरचे रस्ते या आराखड्यात नाहीत. त्यांचाही यात समावेश होणे गरजेचे आहे. यावरून नगरसेवकांनी आवाज उठविला. तर भूमिगत गटार योजनेचे काम झाल्यानंतर शहरातील ६ व ९ मीटरच्या रस्त्यांचे बेहाल झाल्यास त्यांची कशी दुरुस्ती करायची, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यात ९ मीटरच्या रस्त्यांचा समावेश करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. तसे झाल्यास शहरातील बहुतांश रस्त्यांची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. शिवाय होणारे सर्वाधिक नुकसान हे याच रस्त्यांचे आहे. त्यामुळे नगरसेवकांनी केलेली मागणी रास्त आहे. शासनाकडे विशेष प्रस्ताव म्हणून ही मागणी करण्यास न.प.पदाधिकाºयांना जोर लावावा लागणार आहे. मात्र पदाधिकारी आहे त्या रस्त्यांवरुनच वादंग उभे करू लागल्याने पेच निर्माण झाला होता. जेथे नुसतीच प्लॉटिंग आहे, एकही घर नाही, तेथे रस्ता नको, अशी रास्त भूमिका नगराध्यक्ष बांगर यांनी मांडली. डेव्हलपर्ससाठी नव्हे, तर लोकांसाठी रस्ते बनले पाहिजेत, यावर ते ठाम होते. मात्र नंतर जे रस्ते डीपी प्लॅनमध्ये आहेत, अशांना या आराखड्यात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हे वादंग शांत झाले.