रिक्षाचालकांची मोटारसायकलस्वाराला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:46 IST2019-02-23T23:46:34+5:302019-02-23T23:46:51+5:30

कट मारणाऱ्या रिक्षाचालकावर मोटारसायकलस्वार ओरडल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने अन्य रिक्षाचालकांना थांबवून दुचाकीस्वाराला सिनेस्टाईल बेदम मारहाण के ली.

Rickshaw puller's motorbike assault | रिक्षाचालकांची मोटारसायकलस्वाराला बेदम मारहाण

रिक्षाचालकांची मोटारसायकलस्वाराला बेदम मारहाण

औरंगाबाद : कट मारणाऱ्या रिक्षाचालकावर मोटारसायकलस्वार ओरडल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने अन्य रिक्षाचालकांना थांबवून दुचाकीस्वाराला सिनेस्टाईल बेदम मारहाण के ली. यावेळी त्या रिक्षाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने त्याच्या अंगावर रिक्षा घालून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी मुकुंदवाडी ते सिडको बसस्थानक मार्गावर घडली.


एक दुचाकीचालक मुकुं दवाडीकडून सिडको बसस्थानकाकडे जात होता. त्यावेळी मागून सुसाट आलेल्या रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला कट मारला. यामुळे दुचाकीचा अपघात होणार होता. मात्र, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला. त्यावेळी दुचाकीस्वार त्या रिक्षाचालकाला उद्देशून रिक्षा नीट चालविता येत नाही का, असे म्हणाला. त्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने त्याची गाडी दुचाकीसमोर आडवी लावून त्याला शिवीगाळ करून दुचाकीवरून खाली ओढले.

त्यानंतर त्याने अन्य रिक्षाचालकांना थांबवून दुचाकीस्वाराला सिनेस्टाईल रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी भांडण सोडविले. त्यानंतर तेथून जाऊ लागलेल्या रिक्षाचे छायाचित्र दुचाकीस्वार त्याच्या मोबाईलमध्ये घेऊ लागला. हे पाहून मारहाण करणाºया रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराच्या अंगावर रिक्षा घालून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून दुचाकीस्वाराने रस्त्यावरून बाजूला उडी घेतल्याने तो वाचला. रिक्षाचालक रिक्षासह तेथून पसार झाला. यावेळी जालना रोडवर बघ्यांनी वाहने थांबविल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Rickshaw puller's motorbike assault