शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

२० मिनिटांत आढाव्याचा ‘उद्योग’

By admin | Updated: August 20, 2015 00:24 IST

बीड : येथील औद्योगिक वसाहतीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने उद्योजकांना वेळच दिला नाही.

बीड : येथील औद्योगिक वसाहतीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने उद्योजकांना वेळच दिला नाही. केवळ २० मिनीटात घाईघाईने ‘अंदाज’ घेऊन समिती निघून गेली. दिलेल्या वेळेतही उद्योजक मात्र पाणी, वीज आदी सुविधा मिळत नसल्याने आक्रमक झाले होते. विशेष म्हणजे या समितीतील तब्बल २२ आमदारांनी दांडी मारली.आ. अर्जूनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य असलेले मा.आ.मिलिंद माने, आ.शशीकांत खेडेकर, आ.चरण वाघमारे, स्थानिक आमदार अमरसिंह पंडित यांचा समावेश होता. औद्योगिक विभागाशी संबंधित अर्धा डझन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही समितीची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, युवा सेनेचे सुशील पिंगळे उपस्थित होते.उद्योजक उल्हास संचेती यांनी एमआयडसीतील समस्यांचा पाढाच समितीपुढे वाचून दाखविला. परंतु या समस्या मांडत असताना समितीने घाई करत त्यांना थांबविले. परंतु पुन्हा सुरेश देशमुख या उद्योजकाने माईकचा ताबा घेत कैफियत मांडली.त्यानंतर आ.अमरसिंह पंडीत यांनी मुद्दे मांडले. राज्यात इतर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाण्याचे दर १५ रूपये लिटर प्रमाणे आहेत, परंतु बीडमध्ये हेच दर दुपटीने आहेत. मग अशा परिस्थितीत उद्योजक कसे पुढे येतील. नवीन उद्योग कसे उभा राहतील असा सवाल उपस्थित केला. उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी मागे खेचले जात आहे. आणि असे नियमीत चालू राहिले तर उद्योजक आंदोलन उभारतील आणि त्यांना आवरणे अवघड बनेल असे सांगून त्यांनी पाणी व वीज उपलब्ध करून दर कमी करण्याची सूचना केली. याठिकाणच्या उद्योगांना सुविधा मिळाल्या तर उद्योग वाढतील आणि सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असेही आ.पंडीत म्हणाले.उद्योजक ताटकळलेअंदाज समिती बीडमध्ये येण्याची वेळ दुपारी तीन वाजण्याची निश्चीत केली होती. परंतु अंदाज समितीने तब्बल तीन तास उशिराने बीडमध्ये आपले आगमन केले. दुपारी तीन ते सायं. सहा वाजेपर्यंत उद्योजक एमआयडीसीत समितीची चातकाप्रमाणे वाट पहात होते. अधिकाऱ्यांची तर नियोजन करण्यातच तारांबळ उडाल्याचे दिसले.समस्या जाणून घेण्यासाठी वेळ द्याउद्योजकांच्या समस्या भरपूर आहेत, दिवसभर सांगितले तरी त्या संपणाऱ्या नाहीत, परंतु वीज, पाणी, रस्ते, नाल्या यासारख्या विषयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थोडा वेळ दिला तर आम्ही त्या मांडू शकू. एवढ्या वेळेत आम्ही काय सांगणार? जे लोक यापूर्वी आढावा घेऊन गेले, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सबसिडी देण्याचे मार्ग चुकीची आहेत, यामुळे उद्योजक पुढे येत नाही, आणि उद्योग कमी होत चालल्याचे उद्योजकांनी समितीला सांगितले. (प्रतिनिधी)