शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांना ‘महसुली’ दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:07 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच वाळूचा अधिकृत उपसा सुरू आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच वाळूचा अधिकृत उपसा सुरू आहे. चोरट्या मार्गाने शहरात मोठ्या प्रमाणात वाळू येत असल्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने शुक्रवारी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई केली. बीड रोड आणि जळगाव रोडवर चोरटी वाहतूक करणारी आठ वाहने पकडण्यात आली. महसूलच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.जिल्हा प्रशासनाने उन्हाळा सुरू होण्यापूर्वी विविध नदीपात्रातील वाळू उपशासाठी जाहीर प्रगटन दिले. प्रशासनाच्या या आवाहनाला वाळूमाफियांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. फुलंब्री आणि सिल्लोड येथे वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात येत आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या भागात वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांसाठी नंदनवन म्हणजे गोदा पात्र होय. गोदावरीच्या पात्रात एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. अवैधरीत्या काही वाळूमाफियांनी गोदापात्रातून व्यापक प्रमाणात वाळू उपसा सुरू केल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत पथकाने जळगाव रोड, बीड रोडवर कारवाई केली. हायवा वाहनांसह काही ट्रकही पकडण्यात आले. एकूण कारवाईत आठ वाहने जप्त करण्यात आली. या वाहनचालकांकडे खाडाखोड केलेल्या रॉयल्टीच्या चिठ्ठ्या सापडल्या. महसूलचे पथक वाळू कोणत्या नदीपात्रातून उचलण्यात आली याचा शोध घेत आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुंडलोड यांनी सांगितले. कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत काळे, मंडळ अधिकारी सतीश देशमुख, वाहनचालक जाधव आदींची उपस्थिती होती.