शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सेवानिवृत्त चालक टाकणार ‘एसटी’चा गिअर ! करार पद्धतीवर होणार नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 15:44 IST

माजी चालक ‘एसटी‘चे स्टिअरिंग पुन्हा हाती घेण्यास उत्सुक

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसाेय होत आहे. या सगळ्यात एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची तयारी केली आहे. त्याला औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक माजी चालक एसटीचे स्टिअरिंग पुन्हा हाती घेण्यासाठी पुढे येत आहेत.

राज्यभर एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ५ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरात प्रसिद्ध होताच अनेक माजी चालकांची पावले एसटी महामंडळाच्या कार्यालयाकडे वळली आहेत. आतापर्यंत ३६ माजी चालकांनी अर्ज केले आहेत. ही संख्या रोज वाढत आहे. परंतु अशा प्रकारे माजी चालक घेण्यावर आंदोलनात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सेवानिवृत्त झालेल्यांना कसे घेता येईल, त्यांच्या प्रशिक्षणाचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

..यांना मिळणार नोकरीचालक म्हणून रुजू होण्यासाठी वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे. एसटी महामंडळातील सेवाकाळात अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघात झालेला नसणे, कर्मचारी हा शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त झालेला नसावा. चालकाकडे अवजड वाहन चालन परवाना वैध असणे गरजेचे आहे. तसेच पीएसव्ही बिल्लाही आवश्यक आहे.

महिन्याचा पगार २० हजारकारपद्धतीवरील चालकपदासाठी २० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. याशिवाय कोणतेही भत्ते व अन्य लाभ देय राहणार नाही. इच्छुक चालक ते ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीवर अर्ज करू शकत आहेत.

रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरूसेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्यासाठी अर्ज येत आहेत. आतापर्यंत ३६ जणांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात पुढील आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील एकूण चालक -१०७२सध्या कामावर हजर चालक -१३०कोणत्या आगारातून किती बसेस रस्त्यावर?आगार- बसेस रस्त्यावरसिडको -२९मध्यवर्ती-४१पैठण-१७सिल्लोड-४वैजापूर-५कन्नड-२३गंगापूर-३सोयगाव-४

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबाद