शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा ठराव

By admin | Updated: July 30, 2014 00:50 IST

लातूर : धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी समाजातर्फे आंदोलन सुरु आहे़

लातूर : धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी समाजातर्फे आंदोलन सुरु आहे़ बारामतीतील आंदोलन मागे घेण्यात आले तरी लातुरात हा लढा अधिक तीव्र करण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या बैैठकीत घेण्यात आला़धनगर समाजाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी लातुरात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला़ बारामतीमधील आंदोलन जरी मागे घेण्यात आले तरी आता राज्यभर नव्याने आंदोलन सुरु करण्याचे सूतोवाच या बैठकीतून करण्यात आले़ त्याअंतर्गत रास्ता रोको, रेल रोको, बंद, निदर्शने अशा मार्गाने आंदोलने करण्यात येतील़ शिवाय, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू न देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला़ गेल्या ६५ वर्षांपासून असलेल्या धनगर समाजाच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे़ आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचे ठरविण्यात आले़ यावेळी श्रीरंग शेवाळे, कैलास होळकर, बाळासाहेब होळकर, मधुशंकर टिळे, अ‍ॅड़अनिरुद्ध येचाळे, संतोष होळे, प्रवीण येळे, विशाल देवकते, धनराज माने, राजपाल भंडे, श्रीमती भोकरे, सुभाष लवटे, अ‍ॅड़मंचकराव डोणे, अ‍ॅड़शिंदे, मनोज अभंगे, पांडुरंग लिंबाळकर, भाऊसाहेब हाके-पाटील, रामकिसन मदने, गोविंद बैकरे, बाबूराव कनाळे, नारायण राजुरे, अ‍ॅडक़ोळगावे, गंगाधर केराळे, नानासाहेब कस्पटे, मनोहर व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)हा पवारांचा डाव़़़राष्ट्रवादीचे नेते मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला धनगर समाजाविरुद्ध भडकविण्यात येत आहे़ यामागे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचाच डाव असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला़