छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण; घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By संतोष हिरेमठ | Published: June 17, 2024 12:12 PM2024-06-17T12:12:20+5:302024-06-17T12:13:58+5:30

रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत  नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला.

resident doctor beaten up in Chhatrapati Sambhajinagar; Strike by doctors at Ghati Hospital | छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण; घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण; घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

वार्ड  १९ मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आवश्यक ते उपचार करीत होते, तरीही या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत  नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला. या मारहाणीत संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी  कामबंद आंदोलन करीत असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. दरम्यान, हल्ला करणाऱ्यास अटक होईपर्यंत रुग्णसेवा देणार नाही, केवळ आयसीयू मध्ये रुग्णसेवा चालू असेल असा पवित्रा आंदोलक डॉक्टरांनी घेतला आहे.

Web Title: resident doctor beaten up in Chhatrapati Sambhajinagar; Strike by doctors at Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.