शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे वर्षांपूर्वीच्या जनगणनेचा अहवाल विद्यापीठात

By admin | Updated: August 22, 2014 00:18 IST

औरंगाबाद : निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर यांनी आपले संपूर्ण ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिले

औरंगाबाद : निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर यांनी आपले संपूर्ण ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिले असून, यामध्ये सन १६५० ते १८०० पर्यंत प्रकाशित झालेल्या ४ हजार दुर्मिळ ग्रंथसंपदेचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाने आजपासून दोन दिवस ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राजे शामराज रायबहाद्दूर यांनी भेट दिलेले सर्व दुर्मिळ ग्रंथ व अन्य ग्रंथसंपदा वेगवेगळ्या दालनांमध्ये मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनास विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी प्रदर्शनातील ग्रंथसंपदेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी. वेरूळजवळील राजेराय टाकळी येथे आजही त्यांचे ऐतिहासिक घर आहे. त्यांना लिहिणे व वाचण्याची जिज्ञासा होती. त्यांनी आपले स्वतंत्र ग्रंथालय उभारलेहोते. आपल्या गावच्या परिसरात सुरू झालेल्या या विद्यापीठावर त्यांची फार श्रद्धा होती. १९६० मध्ये त्यांनी स्वत:ची संपूर्ण ग्रंथसंपदा, ग्रंथालयातील फर्निचर हे विद्यापीठाला भेट दिले. ४००० दुर्मिळ ग्रंथांचा तो ठेवा आजही विद्यापीठाच्या ग्रंथालयाने जिवापाड जतन करून ठेवला आहे. यामध्ये राजे शामराज रायबहाद्दूर यांच्या हस्तलिखितांचे २१४ खंड, छोट्याशा डबीत मावेल अशी भगवद् गीता, महाभारत, दीडशे वर्षांपूर्वीचा जनगणनेचे अहवाल (पुस्तक), १८३७ सालचे अजिंठा लेणीवरील जॉन ग्रिटीक लिखित ग्रंथाचा समावेश आहे.