गणराया बळीराजावरील संकट दूर कर; धनंजय मुंडेंचे बप्पाकडे साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 18:55 IST2023-09-19T18:55:22+5:302023-09-19T18:55:51+5:30

वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी रद्द

Remove the crisis on Ganaraya Baliraja; Dhananjay Munde's secret to Bappa! | गणराया बळीराजावरील संकट दूर कर; धनंजय मुंडेंचे बप्पाकडे साकडे!

गणराया बळीराजावरील संकट दूर कर; धनंजय मुंडेंचे बप्पाकडे साकडे!

परळी (बीड) - कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ येथील पंढरी या निवासस्थानी आज बप्पा विराजमान झाले. ''नैसर्गिक संकटामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये माझा शेतकरी बळीराजा मात्र संकटात आहे. त्यामुळे हे गणराया तुम्ही सुखकर्ता व दुःखहर्ता होऊन माझ्या शेतकरी बळीराजावरील संकट दूर करा'', असे साकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गणपती बप्पाच्या चरणी घातले.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र, दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी संकटात आहे, यामुळे मंत्री मुंडे यांनी यावर्षीचा वैद्यनाथ गणेश महोत्सव रद्द केला. मुंडे यांनी सपत्निक विधिवत पूजन करून गणेशाची जगमित्र कार्यालयात स्थापना केली. यावेळी मंत्री मुंडे यांनी उपस्थितांसह राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड,  शिवाजी सिरसाट, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रामेश्वर मुंडे, सुनीलनाना फड, सुरेश टाक, माणिकभाऊ फड, माऊली तात्या गडदे, नाथ प्रतिष्ठाण चे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तुळशीराम पवार, युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड, नाथ प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष शंकर कापसे, वैजनाथराव बागवाले, ऍड.मनजीत सुगरे, अमित केंद्रे, संदीप दिवटे यांसह आदी उपस्थित होते.

Web Title: Remove the crisis on Ganaraya Baliraja; Dhananjay Munde's secret to Bappa!