विमा कंपनीची फसवणूक करणाºया चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:31 IST2019-05-27T21:30:45+5:302019-05-27T21:31:02+5:30
फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींचा दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी सोमवारी (दि. २७) फेटाळला.

विमा कंपनीची फसवणूक करणाºया चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
औरंगाबाद : बनावट मृत्यू प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे सादर करून जीवन विमा कंपनीच्या जनश्री योजनेंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींचा दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी सोमवारी (दि. २७) फेटाळला.
अलीखान दाऊद खान (५३), मोईन खान रहीम खान (४३, दोघे रा. हर्सूल), शंकर लक्ष्मणराव गायकवाड (४५, रा. विष्णूनगर) व नंदा भारत बोराडे (४५, रा. सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी आरोपींच्या अर्जाला विरोध केला.