शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा पुन्हा प्रभारी कारभार

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक सोमवारी सायंकाळी संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि बीसीयूडी संचालक सोमवारी सायंकाळी संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले. त्यामुळे अन्य प्राध्यापकांकडे या दोन्ही पदांचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. शिवाय प्रभारी कु लसचिव पदाचा कार्यभारही बदलण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा नव्या प्रभारींच्या खांद्यावर आला आहे.स्पेनच्या दौऱ्यामुळे १६ फेब्रुवारीपर्यंत प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे अर्थशास्त्र विभागातील वरिष्ठ प्रा. डॉ. विनायक भिसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. प्रभारी बीसीयूडी संचालकपदाची सूत्रे डॉ. के. व्ही. काळे यांच्याकडून डॉ. वि. ल. धारूरकर यांनी स्वीकारली. शिवाय डॉ. काळे यांच्याकडूनच प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार डॉ. गणेश मंझा यांनी स्वीकारला. विद्यापीठाचा कारभार गेल्या काही दिवसांपासून प्रभारींवर पडत असल्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावत असल्याचे चित्र दिसून येते. फायलींचा निपटारा होत नसल्यामुळे अनेकांवर उशिरापर्यंत काम करण्याची वेळ येत आहे. यामध्ये आता नव्याने भर पडली आहे. विद्यापीठातील प्रभारी कुलसचिवपद म्हणजे संगीत खुर्चीच झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या खुर्चीवर प्रभारींना बसविल्यावर अवघ्या काही दिवसांतच उठविले जात असल्याचे दिसून येत आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे हे एक आठवड्याच्या अभ्यास, संशोधन कार्यासाठी स्पेनला रवाना झाले आहेत. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या दौऱ्यात ‘युनिव्हर्सिटी आॅफ दि कॉम्पेस्टोला’ व ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ या दोन विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या अंतर्गत संशोधक, प्राध्यापकांचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.