शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक उपायुक्तांनी फेटाळले अपील

By admin | Updated: May 27, 2015 00:41 IST

बीड : राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयातील चार शिक्षकांनी नियुक्तीवरुन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते

बीड : राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयातील चार शिक्षकांनी नियुक्तीवरुन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते. हे अपील प्रादेशिक उपायुक्तांनी नुकतेच फेटाळून लावले आहे. सारीका बेडके, नितीन आलगुडे, बाळू खोमणे, बिभीषण भोयटे हे चौघे विशेष शिक्षक म्हणून रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयात कार्यरत २०११- १२ मध्ये एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत होते. संस्थेच्या नियुक्तीआदेशाआधारे २०१२-१३ या कालावधीत काम करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या चारही शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात मान्यता दिली होती. त्यानुसार शिक्षकांनी १७ आॅगस्ट २०१३ पर्यंत काम केले;परंतु संस्थेने केलेली सेवासमाप्तीची कार्यवाही बेकायदेशीर ठरवून रद्द करावी तसेच रूजू करुन सेवासातत्य व थकित वेतन मिळावे यासाठी शिक्षकांनी प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते.त्यानंतर संस्थेने आक्षेप नोंदवला. प्रादेशिक उपायुक्त एस. आर. वळवी यांनी आक्षेप अर्ज मान्य करत शिक्षकांचे अपील फेटाळून लावले.शिक्षकांवर ठपकाप्रादेशिक उपायुक्त वळवी यांनी शिक्षकांचे अपील फेटाळण्याबरोबरच त्यांना फटकारलेही. विहित मुदतीत अपील दाखल केले नाही. प्रतिवादी म्हणून उल्लेख केलेले मुख्याध्यापक संतोष सरोदे यांना संस्थेने बडतर्फ केले आहे. असे असतानाही प्रतिवादी म्हणून त्यांचा उल्लेख केला. अपिलात दुरुस्ती केली नाही. मुख्याध्यापक सरोदे यांच्याशी संगणमत करुन खोटे पुरावे तयार केले. अपील प्रथमदर्शनी स्वच्छ हाताने दाखल केले नाही. (प्रतिनिधी)