शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या बदलीचे ‘सस्पेन्स’ कायम

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचे सस्पेन्स (रहस्य) अजूनही कायम आहे. आयुक्त डॉ. कांबळे २४ जुलैनंतर आज पालिकेत परतले. त्यांनी सकाळपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संचिका हातावेगळ्या करण्याचा सपाटा सुरू केला. अनेक तुंबलेल्या संचिका ते निकाली काढत होते. शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात, संजय पवार यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक मो. रा. थत्ते यांना घेऊन आयुक्तांनी महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा केली. बदलीबाबत आयुक्तांना विचारले की, आता वेलकम बॅक समजायचे का? यावर त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलवली. मात्र, बदली झाली की नाही. पूर्णविराम मिळाला की चर्चा सुरू राहणार आहे, यावर ते म्हणाले, शासनाचा नोकर आहे, कुठेही काम करावे लागेल. मागील काही दिवसांमध्ये नागपूरला गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहरात डेंग्यूची साथ पसरलेली असताना पदाधिकारी मात्र, आज आयुक्तांना घेरून संचिकांवर स्वाक्षऱ्या घेताना दिसून आले. साथरोगांपासून शहराला मुक्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर निर्णय घेणे गरजेचे असताना पदाधिकारी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना गराडा घालून बसले होते. त्यावेळी पदाधिकारी वॉर्डातील संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आयुक्तांकडे गेले होते.आता लक्ष १ आॅगस्टकडे निवडणूक आयोगाने ३१ जुलैपूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत राज्य शासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत किंवा १ आॅगस्ट रोजी मनपा आयुक्तांची बदली होऊ शकते. जर तसे झाले नाही, तर त्यांची बदली विधानसभा निवडणुकीनंतरच होईल, असा अंदाज आहे.संचिका आणि स्वाक्षऱ्या आयुक्तांची बदली होणार नाही असे समजावे तर मग त्यांनी खोळंबलेल्या संचिका निकाली काढण्याची घाई कशासाठी चालविली हा प्रश्न आहे. बदली होणार असेल तेव्हाच अशी घाई होत असते, हे तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्या बदलीनंतरच्या अनुभवावरून दिसते. संशोधन केंद्रावर सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, त्र्यंबक तुपे, बन्सीलाल गांगवे आदी संचिकांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आले होते. आठवड्यापासून आयुक्त पालिकेत नसल्यामुळे संचिका त्यांच्या स्वाक्षरीविना तुंबू शकतात. मात्र, आयुक्तांची बदली होणार नसेल तर घाई कशाला, असाही प्रश्न आहे.