शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ तक्रारींचाही लागेना निकाल!

By admin | Updated: December 8, 2015 00:05 IST

हणमंत गायकवाड , लातूर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या लोकशाही दिनात किरकोळ तक्रारींवरही जागेवर निकाल लागत नाही़

हणमंत गायकवाड , लातूरदर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या लोकशाही दिनात किरकोळ तक्रारींवरही जागेवर निकाल लागत नाही़ सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात केवळ ८ तक्रारी दाखल होत्या़ यापैकी एकाही तक्रारीचा निकाल लागू शकला नाही़ लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहूनही तक्रारकर्त्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे़जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन झाला़ या लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज आले होते़ त्यापैकी पोलीस विभागाशी संबंधीत ३, महसूल २, जिल्हा परिषद २ आणि महावितरण विभागाशी संबंधीत १ अर्ज होता़ दुपारी १२ ते १़३० वाजेपर्यंत लोकशाही दिन झाला़ परंतु यापैकी एकाही तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा निकाल लागू शकलेला नाही़ साध्या आणि किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी असतानाही लोकशाही दिनात न्याय मिळाला नाही़ वारंवार तक्रारी देऊनही न्याय मिळत नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे़ सोमवारी दाखल झालेल्या सर्वच तक्रारी संबंधीत विभागाकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून वर्ग करण्यात आल्या आहेत़ लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, महावितरणचे मुख्य अभियंता बी़ ए़ वासनीक, कार्यकारी अभियंता सुरेश फेरे, जिल्हा उपनिबंधक बी़ एल़ वांगे, विभाग नियंत्रक डी़ बी़ माने, उपकार्यकारी अभियंता ओ़ के़ कुंचमवार, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एस़ जी़ टिंगळे, गटविकास अधिकारी बी़ टी़ चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ़ पी़ एस़ कापसे यांची उपस्थिती होती़ परंतु तक्रारींवर निकाल लागला नाही़