शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘एनए’साठी भरलेली रक्कम सव्याज परत करा

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील मालमत्ताधारकांनी ‘एनए- ४७ बी’ करण्यासाठी भरलेली रक्कम सव्याज परत करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयाकडे केली आहे.

औरंगाबाद : सातारा परिसरातील मालमत्ताधारकांनी ‘एनए- ४७ बी’ करण्यासाठी भरलेली रक्कम सव्याज परत करण्याची मागणी सातारा परिसर विकास महिला कृती समितीने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयाकडे केली आहे.सातारा परिसरातील एनए-४५ मध्ये केलेली सर्व बांधकामे १५ डिसेंबर २०११ ते १५ मार्च २०१२ या काळात दंड आकारून नियमित केली जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले होते. यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. नागरिकांनी एनएन-४५ असणारी मालमत्ता एनए-४७ ब करण्यासाठी ३५ रुपयांचा अर्ज विकत घेऊन सर्व कागदपत्रांसह १४४५ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरला. तीन वर्षे झाली तरीही मालमत्ता नियमित झालेल्या नाहीत. आगामी काळात सातारा-देवळाई नगर परिषद अस्तित्वात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी भरलेल्या पैशांचा काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे भरलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. निवेदनावर सातारा परिसर विकास महिला कृती समितीच्या अध्यक्षा मेघा थोरात, बी. बी. थोरात, टी. एम. मकर, एस. पी. कुलकर्णी, एस. एम. वारके, कांताराम भोसले, सिंधू बनसोडे, मालती शिंदे, बी. व्ही. काकडे, बबन सानप, छाया जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.