शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
2
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
4
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
5
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
6
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
7
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
8
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
9
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
10
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
11
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
12
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
14
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
15
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
16
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
17
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
18
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
19
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
20
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खाताय ते 'चीज' अस्सल की कृत्रिम? आता मेनुकार्डवर द्यावी लागणार माहिती; FDA चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:03 IST

‘चीज ॲनालॉग’बाबत ग्राहकांना सांगावेच लागणार, ग्राहकांची फसवणूक टळणार, एफडीएचा केटरर्सना सज्जड दम

छत्रपती संभाजीनगर : खाद्यपदार्थांमध्ये ‘चीज ॲनालॉग’ (कृत्रिम चीज) आणि बनावट पनीरच्या वाढत्या वापराबाबत अन्न व औषधी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील केटरिंग व्यावसायिकांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पदार्थात कृत्रिम चीज किंवा पनीर वापरले असेल, तर त्याचा मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे आणि ऑर्डर घेताना ग्राहकाला कल्पना देणे बंधनकारक आहे, असे कडक निर्देश देण्यात आले.

सहायक आयुक्तांच्या(अन्न) मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी प्रशासनाने अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

-व्यावसायिकांसाठी हे नियम-चीज, पनीर किंवा इतर कच्चे अन्नपदार्थ केवळ अधिकृत परवानाधारक पुरवठादारांकडूनच खरेदी करावेत आणि त्याचे पक्के बिल जवळ ठेवावे.-मेन्यूकार्डवर चीज की चीज ॲनालॉग वापरले आहे, याचा ठळक उल्लेख असावा.-अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करून त्याचा विश्लेषण अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य आहे.-स्वयंपाकाची जागा स्वच्छ असावी. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डोक्यावर टोपी, ॲप्रन आणि ग्लोव्हज् वापरावेत. स्टीलचीच भांडी वापरावीत.

कारवाईचा इशाराअनेकदा खर्च वाचवण्यासाठी अस्सल चीजऐवजी स्वस्त चीज ॲनालॉग वापरले जाते. ही बाब गांभीर्याने घेत सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी इशारा दिला की, शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग युनिट्सची अचानक तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल. या बैठकीला अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, केटरिंग असोसिएशनचे पदाधिकारी आणि शहरातील मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते. अन्न हाताळणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

काय आहे ‘चीज ॲनालॉग’?चीज ॲनालॉग हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांऐवजी वनस्पती तेल आणि इतर रसायनांपासून बनवले जाते. दिसायला हे हुबेहूब चीजसारखेच असते; पण त्याची चव आणि गुणधर्म अस्सल दुग्धजन्य चीजपेक्षा वेगळे असतात. केवळ स्वस्त मिळते म्हणून याचा वापर वाढला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Real or Fake Cheese? FDA Mandates Menu Disclosures Now!

Web Summary : FDA mandates clear menu disclosure of artificial cheese use following rising concerns. Caterers must inform customers; violations face strict action. Use licensed suppliers only.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न