मराठा आरक्षणच्या मागणीसाठी केज तालुक्यात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:28 IST2018-07-26T18:26:01+5:302018-07-26T18:28:16+5:30
मराठा आरक्षणच्या मागणीसाठी तालुक्यातील सावळेश्वर येथे आज सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी केज तालुक्यात रास्तारोको
केज (बीड ) : मराठा आरक्षणच्या मागणीसाठी तालुक्यातील सावळेश्वर येथे आज सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासोबतच आंदोलकांनी परळी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
रास्तारोकोमध्ये आनंदगाव, पैठण, वाकडी,जवळबन, पाथरा या गावातील आंदोलकांचा सहभाग होता. तसेच या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.