'सध्या लग्न करणे शक्य नाही, तू गर्भपात कर'; तरुणीवर अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 17:39 IST2021-03-24T17:37:04+5:302021-03-24T17:39:04+5:30

rape and abortions on young women लग्नाचे आमिष दाखवून त्याने साई टेकडी परिसरात, एका कॅफेशेजारील मित्राच्या खोलीवर तसेच पीडितेच्या आजीच्या घरी, कमलनयन बजाज रुग्णालयाच्या मागील निर्जनस्थळी आदी ठिकाणी तिला नेऊन त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 

rape and abortions on young women in the lure of marriage | 'सध्या लग्न करणे शक्य नाही, तू गर्भपात कर'; तरुणीवर अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल

'सध्या लग्न करणे शक्य नाही, तू गर्भपात कर'; तरुणीवर अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्दे तक्रारदार पीडिता आणि आरोपीमध्ये मे २०१७ पासून मैत्री आहे. लग्न करण्याचा आग्रह धरला असता त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला.

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून प्रियकर तरुणाने चार वर्षे लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारामुळे पीडितेला गर्भधारणा झाल्यावरही त्याने तिला औषधी गोळ्या खाण्यास देऊन तिचा दोन वेळा गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

आनंद दिलीप जाधव (२२, रा. महूनगर, बीड बायपास) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपीमध्ये मे २०१७ पासून मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपी तिला विविध ठिकाणी फिरायला घेऊन जात. या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून त्याने साई टेकडी परिसरात, एका कॅफेशेजारील मित्राच्या खोलीवर तसेच पीडितेच्या आजीच्या घरी, कमलनयन बजाज रुग्णालयाच्या मागील निर्जनस्थळी आदी ठिकाणी तिला नेऊन त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 

या कालावधीत तिला गर्भधारणा झाल्याचे समजताच ती त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करीत. तो प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून लग्नाचा विषय टाळून नेत. सध्या लग्न करणे शक्य नाही यामुळे तू गर्भपात कर असे म्हणून तो तिला गर्भपाताची औषधी गोळ्या खाऊ घालायचा. असे दोन वेळा झाल्यावर पीडितेला त्याच्या हेतूबद्दल संशय आल्याने तिने त्याला गाठून लग्न करण्याचा आग्रह धरला असता त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. आरोपीने आपले शोषण करीत अत्याचार केल्याचे लक्षात आल्यावर तिने त्याच्याविरुद्ध सोमवारी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक साधना आढाव तपास करीत आहेत.

Web Title: rape and abortions on young women in the lure of marriage