शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळीतून साकारली ‘स्मार्ट सीटी’!

By admin | Updated: September 16, 2015 00:01 IST

सोमनाथ खताळ , बीड रस्ते व्यवस्थित, दुतर्फा झाडे, सर्व सोयी-सुविधा असलेली स्मार्ट सिटी कशी असावी याची रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट मांडणी करण्याचा प्रयत्न आदित्य इंजिनिअरींग

सोमनाथ खताळ , बीडरस्ते व्यवस्थित, दुतर्फा झाडे, सर्व सोयी-सुविधा असलेली स्मार्ट सिटी कशी असावी याची रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट मांडणी करण्याचा प्रयत्न आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते ‘इंजिनिअर्स डे’चे. वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील प्रकल्पाचीही मांडणी करून पाणी बचत कशी करता येईल याबाबत जनजागृती करण्यात आली.भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा होतो. आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सहा मुलांच्या ग्रुपने वेगळी क्लूप्ती अवलंबून दुष्काळावर कशी मात करता येईल, याबाबत वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा येथील प्रकल्पाची उभारणी केली. जिल्ह्यात बऱ्यापैकी पर्यटन स्थळे आहेत, परंतु नियोजनाचा अभाव आणि सुविधा नसल्यामुळे पर्यटक पुढे येत नाहीत. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी लावलेल्या झाडांना देण्यासाठी पाणी नसते. त्यामुळे वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हाच धागा पकडून या मुलांनी प्रकल्पाची हुबेहुब उभारणी केली. असे प्रकल्प इतर ठिकाणीही उभारले तर परिसरातील सुमारे १५० ते २०० लोकांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. तसेच वृक्ष, जनावरांसह माणसांना पिण्यासाठी मुबलक पाणी राहिल. पर्यावरणाची जपवणूक झाल्यास दुष्काळ आपोआप नष्ट होईल, असा विश्वास या मुलांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे संचालक आदित्य सारडा यांनी प्रकल्पाची पाहणी केली. इतर विभागातील विद्यार्थ्यांनीही पाणी बचत, बेटी बचाव, वीज बचत, पर्यावरण संरक्षण, सायबर क्राईम आदि विषयांवर जनजागृती केली. परिसरात सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. हा प्रकल्प शासनाने हाती घेतला तर खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्वास आदित्य सारडा यांनी व्यक्त केला. तहसीलदार मनिषा तेलभाटे, एस.टी.गिरगावकर, गिरीष गिल्डा, प्राचार्य के.ए.आडे, प्रा. जी.पी.देशमुख यांच्यासह विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.