चंद्र दिसला, रमजान सुरू झाला! आज पहिला रोजा; मशिदींमध्ये 'तरावीह'च्या विशेष नमाजचा निनाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:17 IST2026-02-19T13:16:18+5:302026-02-19T13:17:28+5:30

Ramzan 2026 Start Today: पवित्र चंद्रदर्शन आणि 'तरावीह'ची सुरुवात! आजपासून संयम आणि समर्पणाचा प्रवास सुरू

Ramadan 2026: Moon Sighted in Chhatrapati Sambhajinagar; First Roza Starts Today | चंद्र दिसला, रमजान सुरू झाला! आज पहिला रोजा; मशिदींमध्ये 'तरावीह'च्या विशेष नमाजचा निनाद

चंद्र दिसला, रमजान सुरू झाला! आज पहिला रोजा; मशिदींमध्ये 'तरावीह'च्या विशेष नमाजचा निनाद

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी सायंकाळी ‘मगरीब’च्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. रात्री शहर आणि परिसरातील सर्वच मशिदींमध्ये ‘तरावीह’च्या विशेष नमाजला सुरुवात करण्यात आली. बहुतांश मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथातील तीन पारे (अध्याय) वाचन होणार तेथे भाविकांनी नमाजसाठी अलोट गर्दी केली होती. गुरुवारी पहाटे रोजेदार बांधव ‘सहर’ करतील, त्यानंतर पहिला रोजा सुरू होईल.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

रमजान महिना अत्यंत ‘बरकत’वाला असतो. रमजान या शब्दाचा अर्थ कडक उन्हाळा असा होतो. या महिन्यात ३० दिवस रोजे ठेवण्याचा ‘आदेश’ आहे. रोजा या शब्दाला अरबी भाषेत ‘सौम’ म्हणतात, त्याचा अर्थ थांबणे असा होतो. सूर्योदय होण्यापूर्वीपासून सूर्यास्तापर्यंत खाणे- पिणे आणि शारीरिक गरजा न भागवणे ज्यामुळे सृष्टीचा पालनहार त्यावर खुश झाला पाहिजे. रोजा श्रीमंत आणि गरीब दोघांनाही ठेवावा लागतो. श्रीमंत व्यक्तीला रोजा ठेवल्यावर एक गरीब कसा राहत असेल याची जाणीव व्हावी हासुद्धा दृष्टीकोन त्यामागचा आहे.

मागील दोन आठवड्यांपासून शहरात रमजान महिन्याची जोरदार तयारी सुरू होती. शहरातील सर्वच मशिदींमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ‘मगरीब’च्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्याची घोषणा सिटीचौकस्थित हिलाल कमिटीतर्फे करण्यात आली. आज हमखास चंद्रदर्शन होईल, अशी अपेक्षा भाविकांना होती. मंगळवारी सौदी अरेबियामध्ये चंद्रदर्शन झाले होते.

‘तरावीह’ला सुरुवात
बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री ‘इशां’च्या नमाजनंतर शहरातील विविध मशिदींमध्ये ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले. या नमाजसाठी शहरातील जामा मशीद, किलेअर्क येथील शाही मशीद, शहागंज कला मशिदींमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. गुरुवारी पहाटे रोजेदार बांधव ‘सहर’ करतील. हा त्यांचा पहिला रोजा असणार आहे.

Web Title : चाँद दिखा, रमज़ान शुरू! आज पहला रोज़ा; मस्जिदों में नमाज़ की गूंज।

Web Summary : चाँद दिखने के साथ रमज़ान शुरू हो गया, मस्जिदों में विशेष नमाज़ें हुईं। मुस्लिम समुदाय सूर्योदय से सूर्यास्त तक उपवास रखकर, सहानुभूति और धर्मनिष्ठा पर ज़ोर देते हुए इस पवित्र महीने को मनाते हैं। मस्जिदों को सजाया गया था।

Web Title : Moon Sighted, Ramadan Begins! First Fast Today; Prayers Echo in Mosques.

Web Summary : Ramadan begins with moon sighting and special prayers in mosques. Muslims celebrate the holy month with fasting from dawn till dusk, emphasizing empathy and piety. Preparations were underway, with mosques adorned for the occasion.