शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार निवडीसाठी राज ठाकरे येत्या आठवड्यात औरंगाबादेत

By admin | Updated: August 23, 2014 00:48 IST

राज ठाकरे हे येत्या आठवड्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. गटनेते बाळा नांदगावकर यांनी सादर केलेल्या यादीतील इच्छुकांशी संवाद साधून उमेदवारांविषयीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर उमेदवार निश्चित करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या आठवड्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते गटनेते बाळा नांदगावकर यांनी सादर केलेल्या यादीतील इच्छुकांशी संवाद साधून उमेदवारांविषयीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत मनसेला सपाटून मार खावा लागला. निवडक जागा लढवूनही सर्व जागांवर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून विधानसभा निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर आणि पक्षाच्या इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा दौरा करून पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना जवळपास दीडशेहून अधिक इच्छुकांची यादी सादर केली. त्यातून उमेदवार निवडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादेत येणार आहेत. औरंगाबादेत मराठवाड्यातील एकेका इच्छुकाशी ते संवाद साधून उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय घेणार असल्याचे संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी सांगितले.