शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी संजीवनी’ला जिल्ह्यात मिळेना उभारी

By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती व बिले अदा करायची मानसिकताच नसल्यामुळे या योजनेचा कालावधी वाढविला तरीही संजीवनीच मिळाली नाही. आॅगस्ट २०१४ ला योजनेचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात येथील मंडळातून योजनेला उभारी देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ग्राहकांना योजनेची माहिती होण्यासाठी वीज बिलासोबत योजनेची माहिती पुस्तिका देण्यात आली तसे स्थनिक पातळीवर अभियंत्यांनी योजनेची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिली. मात्र काळाच्या ओघात योजनेला मरगळ आली. १ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या योजनेच्या कालावधीत लातूर, बीड, उस्मानाबाद परिमंडळात ४६ हजार धारकांनी लाभ घेतला होता तर बीड मंडळातून फक्त १४,७२६ ग्राहकांनी लाभ घेतला. योजनेला समाधानकारक ग्राहकसंख्या न मिळाल्याने योजनेत तब्बल ५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीमध्ये महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारी पोहचिवणे अपेक्षित होते. उलटार्थी या चार महिन्याच्या कालावधीत बीड मंडळातून फक्त ७७५ ग्राहकांची भर पडली आहे. मुदतवाढीचा फायदा तर सोडाच मात्र यंत्रणेवर महावितरणचा अधिक खर्च झाला आहे. योजनेचा उरला पंधरवाडा तब्बल पाच महिन्यांची मुदतवाढ करून देखील ग्राहकांची संख्या वाढली नाही. ३१ मार्चला योजनेचा शेवट होणार आहे. त्यामुळे शेतीपंप धारकांकडून योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)