शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

पंचावन्न लाख वृक्ष लागवडीस पावसाचा ‘ब्रेक’

By admin | Updated: July 4, 2014 00:14 IST

दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे.

दिनेश गुळवे , बीडयावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे. ‘एक व्यक्ती, एक झाड’ या प्रमाणे वृक्षारोपण करण्याचे शासनाचे धोरण आहे. वृक्षलागवड करण्यासाठी ‘शतकोटी वृक्षलागवड’ सारख्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येतात. राज्याच्या एकूण भूभागाच्या ३३ वनक्षेत्र असावे, असा नियम आहे. असे असले तरी महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्के आहे. या तुलने मराठवाड्याचे वनक्षेत्र ६ टक्के आहे. तर, बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र अगदीच अल्प म्हणजे अवघे २.१७ टक्के आहे. वनक्षेत्र अगदीच अल्प असल्याने याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. वनक्षेत्र पुरेसे नसल्यामुळे पावसाचे प्रमाणही घटतेच आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वाढत्या तापमानाचा धोका कमी करण्यासाठी ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना पुढे आली. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ देण्यात आले. यावर्षी जिल्हा परिषदेचे विविध विभाग २६ लाख ५० हजार, वन विभाग १३ लाख, कृषी विभाग ९ लाख आदींप्रमाणे विविध कार्यालयांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्याचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ४५ लाख होते. गतवर्षी सुरुवातीपासूनच पाऊस असल्याने सर्वच विभागाने वृक्षलागवडीचे दिलेले उद्दिष्ठ पूर्ण केले. काही विभागांनीतर दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक वृक्षारोपण केले. यामुळे गतवर्षी तब्बल १२८ टक्के वृक्षलागवड झाल्याचे विभागीय वन अधिकारी काळे यांनी सांगितले. यावर्षीही वृक्षलावगवडीची खड्डे खोदण्यापासून सर्वच तयारी करण्यात आली आहे. शासकीय रोपवाटिकेसह इतर खाजगी रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्यात आली आहे. तर, सामाजिक वनीकरण विभागाने लातूर, उस्मानाबाद आदी ठिकाणाहून रोपे आणण्याचे तयारी केली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातच पुरेसे रोपे उपलब्ध असल्याने रोपे बाहेरून आणावे लागली नाही, यावर्षी मात्र जिल्ह्यात रोपांची टंचाई असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्हा परिषद अंतर्गत ‘शतकोटी वृक्षलागवड’ योजना राबविण्यात येणार आहे तर सामाजिक वनीकरण अंतर्गत हरितसेनासह दुतर्फा वृक्षलागवड, पडिक जमिनीवर वृक्षलागवड, गट वनीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गट वनीकरणातून ५० हजार तर दुतर्फा वृक्षलागवड योजनेतून दहा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. यावर्षी जिल्ह्यात वृक्षलावगडीचे मोठ्याप्रमाणावर नियोजन करण्यात आले असले तरी अद्याप पाऊसच न पडल्याने वृक्षलागवडीस ब्रेक लागला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस पाऊस पडला तर वेळेवर वृक्षारोपण होते. तसेच यावेळी लावलेल्या वृक्षांना पुढे उन्हाळ्यामध्ये जोपण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे जूनमध्ये वृक्षारोपण होणे गरजेचे असल्याचेही सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले. पाऊस पडताच वृक्षलागवड करूगेल्या वर्षी जिल्ह्यासाठी असलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते, यावर्षी पाऊस नसल्याने अद्याप वृक्षलागवड होऊ शकली नाही. वृक्षलागवडीसाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे. पाऊस पडताच वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास विभागीय वन अधिकारी काळे यांनी व्यक्त केला.विभाग गतवर्षीची वृक्षलागवड यावर्षीची वृक्षलागवड नियोजनजिल्हा परिषद २११७७१४ २६ लाख ५० हजार वनविभाग ११०८४३८ १३ लाख कृषी विभाग २११७७१४ ९ लाखसा. वनीकरण ५००००६ २ लाखनगर पालिका, सा. बां. १ लाख १ लाख