वैजापूर परिसरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:35 IST2018-05-13T01:10:39+5:302018-05-14T10:35:46+5:30
शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास वादळी पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली.

वैजापूर परिसरात पावसाची हजेरी
वैजापूर : शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास वादळी पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला. रोटेगाव, आघूर, जरुळ परिसरात टोमॅटोच्या बागांना फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खंडाळा परिसरातही हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही वेळ सुटका झाली.