मराठवाड्यात रेल्वे विद्युतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:42 IST2018-09-15T00:41:19+5:302018-09-15T00:42:47+5:30
मनमाड-मुदखेड या ३९० कि़मी. अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण मार्चमध्येच पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात रेल्वे विद्युतीकरण
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनमाड-मुदखेड या ३९० कि़मी. अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण मार्चमध्येच पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदूषण, इंधन खर्च यासह इतर बाबींमुळे देशातील सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयाचे टष्ट्वीटदेखील त्यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. गत वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मनमाड-मुदखेड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठी सर्वेक्षण निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तांत्रिक कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात मनमाड ते मुदखेड आणि दुसºया टप्प्यात परभणी ते परळी वैजनाथ आणि पूर्णा ते अकोला असे काम केले जाणार आहे. मनमाड-मुदखेड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया जवळपास दोन महिने सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. या मार्गाचे काम कालबद्ध नसले तरी लवकर पूर्ण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्धार आहे.
वाहतूक सुलभ होणार
रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. जालन्याजवळ ड्रायपोर्ट होत आहे. हा पोर्ट कार्यान्वित झाल्यानंतर कृषी उत्पादनांसह स्टील, बियाणे व इतर उत्पादने रेल्वेमार्गाने जेएनपीटी व मुंबईत घेऊन जाणे सोयीचे ठरणार आहे.
दोन टप्प्यांत विद्युतीकरण
रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मनमाड ते मुदखेड या मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर दुसºया ठप्प्यात परभणी ते परळी वैजनाथ आणि पूर्णा ते अकोला या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
....
तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया राबविण्यास काहीसा विलंब झाला; पण नियोजित वेळेत ही पूर्ण होणार असल्याने साधारणपणे फेब्रुवारीत प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकणार आहे.
- राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-मध्य रेल्वे विभाग, नांदेड