शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
4
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
5
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
6
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
7
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
8
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
9
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
10
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
11
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
12
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
13
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
14
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
15
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
16
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
17
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
18
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्ग दुहेरीकरण, छत्रपती संभाजीनगरातील २९२८ मालमत्तांची नावे; बाधित किती? मोजणी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:10 IST

भूसंपादनासाठी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनांमध्ये कोणते गट क्रमांक, किती भूभाग आणि कोणत्या घरांचे संपादन होणार आहे, याची स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते परभणी १७७ कि.मी. अंतरात रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होत आहे. किती जमीन लागणार याची मोजणी झाल्यानंतरच किती मालमत्ता बाधित होणार, हे समजेल, असे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी स्पष्ट केले.

भूसंपादनासाठी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनांमध्ये कोणते गट क्रमांक, किती भूभाग आणि कोणत्या घरांचे संपादन होणार आहे, याची स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. मनमाड ते परभणी या दक्षिण मध्य रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला सुरुवात झाली आहे. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७ कि.मी.चे दुहेरीकरण होत आहे. संभाजीनगर तालुक्यातील शेकटा गावाच्या हद्दीपर्यंत जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर झाली आहे. दरम्यान ‘लोकमत’ने २८ नोव्हेंबरच्या अंकात भूसंपादन अधिसूचनेबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे नागरिकांना नेमके काय होणार, याचा अंदाज आला आहे.

२०१३ च्या कायद्यानुसार मोबदलाशहरातील विद्यमान रेल्वेमार्गालगत असलेल्या मालमत्ताधारकांच्या काही अडचणी आहेत. अपार्टमेंट बिल्डरच्या नावावर असले तरी नागरिक राहत आहेत. गुंठेवारी मालमत्ता आहेत. मोजणीच्या वेळी मालमत्ता कुणाच्या नावावर आहे आणि ताबा कुणाचा आहे, याबाबत आक्षेप आल्यानंतर सुनावणी घेऊन निवाडा होईल. मोजणीपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही. मूळ मालमत्ताधारकांना नोटीस गेल्यावर रेल्वे, बांधकाम विभाग, महसूल, टीएलआर विभागाचे अधिकाऱ्यांसमक्ष मोजणी होईल. शहरी भागात एकास दाेन याप्रमाणे, तर ग्रामीण भागात एकास चारपटप्रमाणे भूसंपादनाचा मावेजा देण्याची तरतूद भूसंपादन कायदा २०१३ मध्ये आहे.-- एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

शहरातील १ हजार ५८ मालमत्ताग्रामीण भागातील सुमारे १८७०, शहरातील १ हजार ५८ मिळून २९२८ मालमत्ता बाधित होतील, असे अधिसूचनेत नमूद आहे. मुळात एवढ्या मालमत्ता बाधित होणार नाहीत. काही मालमत्ता रेल्वेच्या मध्यभागापासून हजार फुटांहून अधिक अंतरावर असतानाही त्यांचे संपादन अपेक्षित आहे का, तसेच नमूद गट क्रमांक पूर्णपणे बाधित होणार की अंशतः याबाबत स्पष्टता नाही.

मुख्यमंत्र्यांची भेटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील विमानतळावर आले असताना, त्यांना आ. संजय केणेकर व शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी रेल्वेमार्ग दुहेरीकरणात स्टेशन ते करमाड या भागातील २९२८ नागरिकांच्या मालमत्ता बाधित होत असल्याच्या अधिसूचनेबाबत माहिती दिली. रेल्वेचा विकास व्हावा, परंतु सामान्य नागरिकांचे घर जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासित केल्याचे शितोळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar-Parbhani Railway Doubling: 2928 Properties Listed; Impact Unclear.

Web Summary : Land acquisition begins for the Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway doubling. Uncertainty surrounds the number of affected properties. A survey is needed to determine the exact impact, says Deputy Collector Eknath Bangale. Concerns arise over compensation and property rights, with assurances from the Chief Minister to minimize citizen displacement.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वे