शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हातभट्टय़ांवर धाडी

By admin | Updated: August 31, 2015 13:21 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.

 लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. या धाडसत्रात एकूण सात जणांना पथकाने अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही मोहीम २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आली.लातूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध दारु विक्री होत असल्याने, दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या हातभट्टय़ांवर धाडी टाकून ३३ हजारांची अवैध दारु जप्त करुन, सात जणांना ताब्यात घेतले. रेणापूर तालुक्यातील केळगाव तांडा येथे पथकाने टाकलेल्या धाडीत शालू राठोड, सविता राठोड, अंकुश राठोड आणि अन्य एक जण असे एकूण चार जण अवैध हातभट्टी दारुविक्री करीत असताना आढळून आले. लातूर तालुक्यातील वसंतनगर तांड्यावर ८00 लिटर रसायन आढळले. या अवैध दारुविक्रीच्या मोहिमेत २६ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाढवणा (बु.) परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दयानंद अण्णाराव कंजे यांच्याजवळ देशी दारुच्या ४५ बाटल्या, सचिन विठ्ठल भांगे ३५ बाटल्या, शादुल वजीर शेख यांच्याजवळ ५0 बाटल्या सापडल्या आहेत. १३५ लिटर एमएलच्या १३0 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तिघांसह अन्य चार जणांना पथकाकडून अटक केली आहे. या सात जणांकडून ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (प्रतिनिधी)