शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात शरद पवार गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न; १५ जागा लढवून केवळ एकच आमदार

By नजीर शेख | Updated: November 28, 2024 12:17 IST

मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ४६ पैकी १५ जागा लढवत केवळ एकच जागा जिंकली आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाढलेल्या प्रचंड ताकदीपुढे पक्षाच्या मराठवाड्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठवाड्यावर माझे विशेष प्रेम आहे, असे सातत्याने सांगणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी बीडची एक जागा वाट्याला आली होती. त्यामध्ये पक्षाचा विजय झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात काँग्रेससोबत आघाडी करीत २३ जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये पक्षाने ८ जागा जिंकून आपला प्रभाव कायम ठेवला होता. २०१४ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा सात जिल्ह्यांत पक्षाचा आमदार नाही. बीडमध्ये एकमेव संदीप क्षीरसागर आमदार आहेत.

पक्ष स्थापनेपासून मराठवाड्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली साथ दिली आणि पक्षाचे चांगले नेटवर्कही तयार झाले. मात्र, २०२३ मधील पक्षातील उभ्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे पक्षातील विधानसभेचे सहा आणि विधान परिषदेतील दोन आमदार गेले, तर शरद पवार गटाकडे दोन आमदार राहिले. यामुळे शरद पवार गटाची ताकद कमी झाली. असे असले तरी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये आठपैकी सात जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला होता. विधानसभेतही चमकदार कामगिरी होण्याची पक्षाला अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीने पक्षाच्या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरले गेले.

आमदारांची संख्या कमी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला चांगला प्रभाव टाकता येण्याची शक्यता नाही. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या अजित पवार गटाकडे तिकिटासाठी गर्दी होऊ शकते. हाही मोठा धोका शरद पवार गटासमोर आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुका होण्यास आणखी साडेचार वर्षे आणि विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण पाच वर्षे बाकी आहेत. यामुळे आगामी काही वर्षांत पक्षाच्या मराठवाड्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

नेतृत्व कोण करणार ?मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत. राजेश टोपे आणि काही प्रमाणात सतीश चव्हाण हे नेतृत्वक्षम चेहरे शरद पवार गटाकडे आहेत. मात्र, हे दोघेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे मराठवाड्यात नेतृत्व कोण करणार, असाही प्रश्न आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडghansawangi-acघनसावंगीgangapur-acगंगापूर