भांडण राहिले बाजूला, भांडखोरांनी मध्यस्थाच्या डोक्यात बॉटल फोडली, पावणेदोन लाख पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:41 IST2023-02-21T19:41:15+5:302023-02-21T19:41:37+5:30
या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भांडण राहिले बाजूला, भांडखोरांनी मध्यस्थाच्या डोक्यात बॉटल फोडली, पावणेदोन लाख पळवले
फुलंब्री: दोघाचे भांडण सुरु असतान ते सोडविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या इसमाच्या खिशातून एक लाख ७० हजार रुपये लांबविण्यात आले. हि घटना रविवारी ७ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सोमवारी फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलंब्री खुलताबाद रस्त्यावर असलेल्या देवगिरी कारखाना परिसरातील एका हॉटेलच्या परिसरात रविवारी रात्री ७ वाजेच्या दरम्यान सागर चोपडे, रुपेश गोरवणे, शुभम इनामदार, पवन घोडके यांच्यात भांडण सुरु होते. यावेळी नारायण वाहटुळे भांडण सोडवण्यासाठी गेले. दरम्यान, सागर चोपडेने वाहटुळे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून दुखापत केली. तसेच इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहटुळे यांच्या खिशातील एक लाख ७० हजार रुपये काढून घेतले.
नारायण एकनाथ वाहटुळे यांनी फुलंब्री पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सागर चोपडे, रुपेश गोरवणे, शुभम इनामदार, पवन घोडके, रा. म्हसला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस जे धुळे हे करीत आहे.