शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी कृउबामध्ये राकाँला धक्का

By admin | Updated: September 6, 2015 23:59 IST

राम लंगे , वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला भाजपाने रविवारी सुरूंग लावला. १८ पैकी १२ जागा खिशात घालून तिरंगी लढतीत

राम लंगे , वडवणीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला भाजपाने रविवारी सुरूंग लावला. १८ पैकी १२ जागा खिशात घालून तिरंगी लढतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. राकाँला केवळ ६ जागांवर समाधान मारावे लागले तर सेनेला खातेही खोलता आले नाही.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तिरंगी सामना झाला. राष्ट्रवादीला भाजपने कडवे आव्हान दिले. दुसरीकडे सेनेनेही चुरस निर्माण केली होती. रविवारी जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. १८ जागांसाठी १०२२ पैकी ९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजार समिती कार्यालयात सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. भाजप उमेदवारांना छत्री, राकाँला कपबशी तर सेनेच्या उमेदवारांना ढाल-तलवार हे चिन्ह होते. कपबशीला छत्री भारी ठरली. ढाल-तलवारीची धार दिसलीच नाही. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.विजयी उमेदवार असेसेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) - दीपक अंबुरे, बद्रीनाथ साबळे, बाबासाहेब सुरवसे, प्रदीप शेळके, अरूण शिंदे, सोमनाथ बडे (सर्व भाजप), संभाजी शिंदे (राकाँ); सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (महिला राखीव) - गोकर्णा शेंडगे, विमल सांगळे (दोन्ही भाजप) ; सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (इतर मागासप्रवर्ग) - हरिश्चंद्र ढवळे (भाजप); सेवा सहकारी सोसायटी मतदासंघ (विमुक्त जाती भटक्या जमाती)- दिनकरराव आंधळे (भाजप),ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण) - बळीराम आजबे (राकाँ), गंगाबाई बादाडे (भाजप) ; ग्रामपंचायत मतदासंघ (अनुसूचित जाती जमाती) - रतन सौंदरमल (राकाँ); ग्रामपंचायत मतदारसंघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)- राम मात्रे (राकाँ); हमाल मापाडी मतदारसंघ - सर्जेराव चव्हाण (राकाँ); व्यापारी मतदारसंघ- विजयकुमार अंडील (राकाँ), भीकाराम आंधळे (भाजप).