वडवणी कृउबामध्ये राकाँला धक्का

By Admin | Updated: September 6, 2015 23:59 IST2015-09-06T23:34:15+5:302015-09-06T23:59:59+5:30

राम लंगे , वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला भाजपाने रविवारी सुरूंग लावला. १८ पैकी १२ जागा खिशात घालून तिरंगी लढतीत

Pushing in Vaduzi | वडवणी कृउबामध्ये राकाँला धक्का

वडवणी कृउबामध्ये राकाँला धक्का


राम लंगे , वडवणी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला भाजपाने रविवारी सुरूंग लावला. १८ पैकी १२ जागा खिशात घालून तिरंगी लढतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. राकाँला केवळ ६ जागांवर समाधान मारावे लागले तर सेनेला खातेही खोलता आले नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तिरंगी सामना झाला. राष्ट्रवादीला भाजपने कडवे आव्हान दिले. दुसरीकडे सेनेनेही चुरस निर्माण केली होती. रविवारी जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. १८ जागांसाठी १०२२ पैकी ९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजार समिती कार्यालयात सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. भाजप उमेदवारांना छत्री, राकाँला कपबशी तर सेनेच्या उमेदवारांना ढाल-तलवार हे चिन्ह होते. कपबशीला छत्री भारी ठरली. ढाल-तलवारीची धार दिसलीच नाही. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
विजयी उमेदवार असे
सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) - दीपक अंबुरे, बद्रीनाथ साबळे, बाबासाहेब सुरवसे, प्रदीप शेळके, अरूण शिंदे, सोमनाथ बडे (सर्व भाजप), संभाजी शिंदे (राकाँ); सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (महिला राखीव) - गोकर्णा शेंडगे, विमल सांगळे (दोन्ही भाजप) ; सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ (इतर मागासप्रवर्ग) - हरिश्चंद्र ढवळे (भाजप); सेवा सहकारी सोसायटी मतदासंघ (विमुक्त जाती भटक्या जमाती)- दिनकरराव आंधळे (भाजप),
ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण) - बळीराम आजबे (राकाँ), गंगाबाई बादाडे (भाजप) ; ग्रामपंचायत मतदासंघ (अनुसूचित जाती जमाती) - रतन सौंदरमल (राकाँ); ग्रामपंचायत मतदारसंघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)- राम मात्रे (राकाँ); हमाल मापाडी मतदारसंघ - सर्जेराव चव्हाण (राकाँ); व्यापारी मतदारसंघ- विजयकुमार अंडील (राकाँ), भीकाराम आंधळे (भाजप).

Web Title: Pushing in Vaduzi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.