Video: प्रेमप्रकरणातून कॉलेजच्या पार्किंगमध्ये तीन तरुणींची फ्री-स्टाईल फाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:50 IST2022-11-28T16:49:51+5:302022-11-28T16:50:42+5:30
औरंगाबादमधील एका कॉलेजच्या पार्किंगमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Video: प्रेमप्रकरणातून कॉलेजच्या पार्किंगमध्ये तीन तरुणींची फ्री-स्टाईल फाईट
औरंगाबाद: शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरात तीन मुलींच्या फ्री- स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शनिवार दुपारचा असल्याची माहिती आहे. दोघी मिळून एका मुलीचा बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्या दोघींनी बेल्टचा देखील मारहाणीत वापर केला आहे.
औरंगपुरा परिसरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये तीनमुली थेट मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघींनी मिळून तिसऱ्या मुलीस बेदम मारहाण केली. एकीने तर तिसरीच्या केसांना पकडून तिला खाली खेचले. तर दुसरीने बेल्टने मारहाण केली. विशेष म्हणजे, जोरदार मारामारीत कोणी मध्यस्थ करत नव्हते. अखेर एक सुरक्षा रक्षक येतो तेव्हा त्या दोघी काहीवेळ थांबतात. पण पुन्हा मारहाण सुरु होते. तेव्हा एक मुलगा मध्ये पडतो. तो तिसरीच्या मध्ये उभा राहून दोघींना मारहाण करण्यापासून रोखतो. त्यानंतर आलेली महिला सुरक्षा रक्षक तिसऱ्या मुलीला तेथून घेऊन जाते. दरम्यान, तिघींमध्ये प्रेमप्रकरणातून मारहाण झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी महाविद्यालय माहिती घेत आहे.