शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब !

By admin | Updated: August 31, 2014 01:08 IST

जालना : शहरात नगरपालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब झाली असून बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे कशीबशी सुरू आहेत. मात्र त्यापैकीही काही बंद आहेत

जालना : शहरात नगरपालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे गायब झाली असून बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे कशीबशी सुरू आहेत. मात्र त्यापैकीही काही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होत आहे. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाखांपर्यंत गेली आहे. व्यापारी पेठ म्हणून शहराची ओळख दूरवर आहे. मात्र सार्वजनिक स्वच्छतालयांची सुविधा या शहरात पाहिजे तशी नाही. सिंधी बाजार, अलंकार, शिवाजीपुतळा, पाणीवेस, शनिमंदिर, रेल्वेस्टेशन चौक इत्यादी भागातील स्वच्छतालये गायब झाली आहेत. गांधीचमन भागातील स्वच्छतागृह कसेबसे सुरू आहे. नूतन वसाहत पोलिस चौकीसमोर, काद्राबाद, जवाहर बाग, काद्राबाद या भागातील स्वच्छतागृहांची पडझड झालेली आहे. मस्तगड परिसरातील स्वच्छतागृह बंद आहे. तर अन्य ठिकाणी स्वच्छतागृहेच नाहीत. नगरपालिकेच्या सभांमधून स्वच्छतागृहांबाबत अनेकदा चर्चा झाली. पालिकेने अनेकदा नवीन स्वच्छतागृहांची उभारणी करण्याची घोषणा केली. मात्र आतापर्यंत ही केवळ चर्चाच राहिली. प्रत्यक्षात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होत आहे. शहरात इतर सुविधांच्या बाबतीत पालिकेने लक्ष घातले. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या बाबतीतही लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.