माथेफिरूने सात गाड्या फोडून म्युझिक सिस्टीम, बॅटऱ्या केल्या लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:36 IST2018-10-10T15:34:17+5:302018-10-10T15:36:21+5:30
चिश्तीया कॉलनीत उभ्या असलेल्या सात कार मंगळवारी रात्री माथेफिरूने फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

माथेफिरूने सात गाड्या फोडून म्युझिक सिस्टीम, बॅटऱ्या केल्या लंपास
औरंगाबाद: चिश्तीया कॉलनीत उभ्या असलेल्या सात कार मंगळवारी रात्री माथेफिरूने फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
फोडलेल्या गाड्यांमधून म्युझिक सिस्टमस आणि बॅटऱ्या चोरून नेण्यात आल्या आहेत. यापैकी एका पिक अप वाहनातून गोळ्या, बिस्किटेची पाकिटे आणि अन्य खाद्य पदार्थसुद्धा चोरीला गेले आहेत. याप्रकरणी शेख अखिल, नासेरभाई, सचिन सोनवणे आदींनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.