शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच चारा

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला.

हिंगोली :खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला. तर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने विविध गावांत शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी मोफत बियाणे वाटप केले होते. त्यानुसार सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात लहान ५७ हजार १५२, मोठी २.८३ लाख जनावरे आहेत. तर शेळ्या १.१२ लाख, मेंढ्या ६0२४ आहेत. तर २0१५-१६ मधील खरीप व रबी हंगामापासून ५.८२ लाख मे. टन चाऱ्याचे उत्पादन झाले आहे. या जनावरांना प्रतिदिन १९४५ मे. टन एवढा चारा लागतो. एक महिन्यासाठी ५८ हजार ३६९ चाऱ्याची गरज आहे. मात्र त्या तुलनेत पुढील आॅगस्टपर्यंत चारा पुरेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सेनगावात १९२, हिंगोलीत १४५, औंढा तालुक्यात २५८, कळमनुरीत १३0 तर वसमत तालुक्यात ४११ दिवस पुरेल एवढा चारा असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. एकंदरीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तरी चाराटंचाईचे चित्र दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून अद्याप जिल्ह्यात एकाही गावात चारा छावणी सुरू झाली नाही. परंतु यातील काही गावांत मात्र पाणीटंचाईचे मोठे संकट असल्याने, कृषी विभागाला अपेक्षित चारा मिळणे अवघड आहे. कृषी विभागाने वाटप केलेले मका बियाणे १०० हेक्टरवर पेरणी केल्याने काही प्रमाणात गुरांना ओला चारा मिळण्यास मदत होईल.