अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:52 IST2025-04-29T11:51:11+5:302025-04-29T11:52:22+5:30

महाराष्ट्र दिनी गौरव : शहर, जिल्हा पोलिस, लोहमार्ग पोलिसांसह एसआरपीएफ पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण

Proud moment! 32 police officers of Chhatrapati Sambhajinagar awarded Director General's medal | अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

छत्रपती संभाजीनगर :पोलिस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातून एकूण ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, लोहमार्गच्या अधीक्षक स्वाती भोर यांचा समावेश आहे.

शहर पोलिस दलातून यासाठी यंदा ३५ अधिकारी व अंमलदारांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच २१ अधिकारी व अंमलदारांना हा सन्मान जाहीर झाला. विशेष म्हणजे, गडचिरोली, मुंबई शहरानंतर छत्रपती संभाजीनगर पाेलिस दलाला सर्वाधिक पदके जाहीर झाली आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या पदक, सन्मानचिन्हाने सर्वांना गौरवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व अंमलदार
-संदीप अनंत आटोळे, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
-स्वाती रामराव भोर, अधीक्षक, लोहमार्ग

पोलिस निरीक्षक
गीता मोतीचंद बागवडे (शहर पोलिस)
अशोक रामलू भंडारे (शहर पोलिस)
शरद बाबूराव जोगदंड (लोहमार्ग पोलिस)

उपनिरीक्षक (शहर पोलिस)
उपनिरीक्षक दीपक सुगनसिंग परदेशी, इसाक उस्मानखान पठाण, मनाेहर नरहरी बुरूड, शेख हबीब खान मोहम्मद, सहायक उपनिरीक्षक संजय जोगदंड, विष्णू लक्ष्मण उगले.

अंमलदार (शहर पोलिस)
सुनील सुरेश बेलकर, मुश्ताक गफूर शेख, मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव, विठ्ठल विनायक मानकापे, दरखशा इल्तेजा रिजवान शेख, संतोष गंगाराम लोंढे, शिवाजी राजाराम कचरे, बाळासाहेब जयसिंग आंधळे, प्रभाकर साहेबराव राऊत, कैलास तेजराव गाडेकर, राजेंद्र देविदास चौधरी, मोहम्मद इरफान मोहम्मद इसाक खान, लक्ष्मण दशरथ कीर्तीकर.

जिल्हा पोलिसांचाही सन्मान
उपनिरीक्षक नारायण भगवान राठोड, गफ्फार खान सरवर खान पठाण, सहायक उपनिरीक्षक शकील अहमद शेख रहीम शेख, खालेद हबीब शेख, अंमलदार अफसर खाजा शेख, राजू वामन खरात.

राज्य राखीव पोलिस बटालियन, सातारा
पोलिस अंमलदार अशोक परशुराम पवार व दिनेश शामराव ढगे.

Web Title: Proud moment! 32 police officers of Chhatrapati Sambhajinagar awarded Director General's medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.