पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 16:41 IST2021-08-24T16:41:14+5:302021-08-24T16:41:38+5:30
डॉ. निखील गुप्ता यांना विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती
औरंगाबाद : शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देत औरंगाबाद येथेच पदस्थापना देण्यात आली आहे. यासाठी शहराचे पोलीस आयुक्तपद विशेष पोलीस महानिरीक्षक ग्रेडवरून अप्पर पोलीस महासंचालक असे करण्यात आले.
डॉ. गुप्ता यांना विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. ही पदोन्नती देतानाच त्यांची पदस्थापना औरंगाबाद येथेच करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. डाॅ. गुप्ता यांची पदोन्नतीने बदली होणार, अशी मागील काही दिवसांपासून शहरात चर्चा होती. यासाठी अनेक जण बदलीची वाट पाहत होते. मात्र, डॉ. गुप्ता यांना पदोन्नतीने शहर आयुक्तपदीच नियुक्ती मिळाली. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला.